एक्स्प्लोर
पुणे मॅरेथॉनकडे स्पर्धकांची पाठ, महापौरांचीही दांडी
32 व्या पुणे मॅरेथॉनला पुणेकरांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, खुद्द महापालिकेनं मॅऱेथॉनचं आयोजन केलेलं असलं तरी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह एकही पदाधिकारी या स्पर्धेला उपस्थित राहिला नाहीत.
पुणे : 32 व्या पुणे मॅरेथॉनला पुणेकरांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, खुद्द महापालिकेनं मॅऱेथॉनचं आयोजन केलेलं असलं तरी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह एकही पदाधिकारी या स्पर्धेला उपस्थित राहिला नाहीत.
पुण्यातील 32 व्या मॅरेथॉनला भारतीय अथलेटिक्स महासंघाने परवानगी नाकारल्यानंतरही, संयोजकांनी स्पर्धा होणारच, असा दावा केला होता. त्यानुसार, आज पुण्यातील सणस बागेपासून मॅरेथॉनला सुरुवात झाली.
माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी फ्लॅग ऑफ केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. पण महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पुण्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अधिकांऱ्यांनीही मॅरेथॉनकडे दांडी मारली.
पण यावेळी स्पर्धकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दरवर्षी महापालिका लाखो रुपयांची बक्षिसं विजेत्या स्पर्धकांना देते. परंतु यंदा ही बक्षीसं दिली जाणार का? अशी चर्चा रंगत असल्याने स्पर्धकांनी मॅरेथॉनकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, आजची ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची मुख्य स्पर्धा इथिओपियाच्या गेटाचेव बेशा यानं जिंकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement