Pune Rain Update: पुणे जिल्हात पाऊस फुल अन् धरणं हाऊसफुल्ल; पानशेत, खडकवासला धरणात 100 टक्के पाणीसाठा
पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Pune Rain Update: पुणे (Pune) जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी (Dam) 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील पाण्याची समस्या संपण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. सर्व धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग करण्यात येणार आहे.भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. मुळशी धरण जलाशय पातळीत देखील वाढ झाली आहे.
दरम्यान, यंदा कडाक्याच्या उन्हानंतर मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. यासह मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे लहान प्रकल्पाची धरणे ओसंडून वाहू लागली. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 18 धरणे भरली आहेत. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
कोणत्या धरणात किती पाणीपाठा?
खडकवासला धरण- 100 टक्के पाणीसाठा
पानशेत धरण- 99.27 टक्के पाणीसाठा
वरसगाव धरण- 96.63 टक्के पाणीसाठा
टेमघरधरण- 82.52 टक्के पाणीसाठी