पुण्यात जोरधारांनी कृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणं खळाळली, कुठे किती पाऊस झाला, विसर्ग किती सुरु? A टू Z माहिती
Dam Water discharge Update: गेल्या काही दिवसांपासून होत असणाऱ्या पावसाने पुण्यातील आढे, नाले ओसंडून वाहतायत. कोणत्या धरणातून किती विसर्ग होतोय? किती पाऊस पडलाय?
Dam Water discharge Update: पुण्यात मागील काही दिवसांपासून आभाळ फाटलंय. मुसळधार पावसानं थैमान घातलं असून कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील 39 धरणक्षेत्रांमध्ये झालेल्या पावसानं बहुतांश धरणं भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असणाऱ्या पावसाने पुण्यातील आढे, नाले ओसंडून वाहतायत. नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. रस्त्यासह पुलांवर पाणी आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, कोणत्या धरण परिसरात किती पाऊस पडला?
पुणे विभागातील मोठे 35 धरणप्रकल्प 95.46 टक्के भरले असून 50 मध्यम प्रकल्पांमध्ये 72.66% पाणीसाठा झालाय. तर एकूण 635 लघू प्रकल्पांमध्ये 38.31 % पाणी शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण पूणे विभागात आज 88.15 % पाणीसाठा झाला आहे.
कोणत्या धरणक्षेत्रात पावसाची स्थिती काय?
पुण्यातील धरणे ही कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये विभागली गेली आहेत. यात कृष्णा खोऱ्यात 13 धरणे असून 26 बंधारे आहेत तर भीमा खोऱ्यात 26 धरणे आणि 52 बंधारे अशी एकून 39 धरणे आणि 78 बंधारे आहेत.
कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये झाला एवढा पाऊस
कृष्णा खोऱ्यात असणाऱ्या पुणे विभागातील एकूण 13 धरणक्षेत्रात दि २६ ऑगस्ट रोजी 1208 mm एवढा पाऊस झालाय. कोयना धरणक्षेत्रात काल 103 mm पावसाची नोंद झालीय. दुधगंगा धरणात झालेल्या मुसळधार पावसानंतर 104mm पावसाची नोंद करण्यात आली असून राधानगरी धरणक्षेत्रात 164mm पाऊस झाल्याची माहिती पूर नियंत्रण विभागानं दिलीय.
राधानगरी धरणातून सध्या 5712 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला असून तुळशी 1000, केसरी 600, पाटगाव 1288, धोम बाल्कवडी 2729, उरमोडी500, येरालवाडी 1561 क्यूसेकचा विसर्ग या धरणांमधून नद्यांमध्ये होत आहे.
भीमा खोऱ्यातील धरणांमधील पाऊस आणि विसर्ग किती?
- भीमा खोऱ्यात पुणे विभागातील एकूण 26 धरणांचा समावेश आहे. यात घोड उपखोऱ्यात 9 धरणे असून भीमा उपखोऱ्यात 4, मुळा उपखोऱ्यात 7 तर नीरा 5 व भीमा उपखोऱ्यात एका धरणाचा समावेश आहे.
- घोड खोऱ्यात असणाऱ्या एकूण ९ धरणांमध्ये काल दिवसभरात १६९ mm पावसाची नोंद झाली. यात डिंभे धरण आता ९८.४९ % भरले आहे.
- मुळा मुठा खोऱ्यात असणारं पवना धरणाच्या परिसरात काल 24mm पाऊस झाला. मुळशी धरणपरिसरात काल 90 mm तर टेमघर 130mm, पानशेत 93mm, खडकवासला 32mm पावसाची नोंद झाली असून ही धरणे आता जवळपास भरली आहेत.
- नीरा नदीच्या उपखोऱ्यात असणारी निरा देवधघर, भाटघर, वीर धरणे १०० टक्के भरली असून काल नीरा देवघर धरण परिसरात 120mm तर वीर धरणक्षेत्रात 23mm पावसाची नोंद झाली.
पुण्यातील कोणती धरणं किती भरली?
डिंभे 97.01 %
पानशेत 96.62%
खडकवासला 52.51 %
पवना 99.44 %
चाकसमान 100 %
घोड 88.69 %
निरा देवघर 100 %
भाटघर 90.06%
हेही वाचा: