एक्स्प्लोर

Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

santosh deshmukh case: संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांची एसआयटी नेमण्यात आली होती. मात्र, या पथकातील अनेक पोलीस अधिकारी वाल्मिक कराड याच्या जवळचे असल्याचा आरोप.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खंडणी प्रकरणातून निर्माण झालेल्य वादातून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या हत्याप्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर महायुती सरकारने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. मात्र, आता या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ.बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.

जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड आणि एसआयटीतील एका अधिकाऱ्याच्या फोटोचा दाखला देत हा गंभीर आरोप केला. संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा अत्यंत खास माणूस आसुन गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात काही निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीत कोण-कोण?

एसआयटीच्या प्रमुखपदी पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना नेमण्यात आले. तर उर्वरित पथकात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह शिवलाल जोनवाल आणि उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ, पोलीस नेते चंद्रकांत एस. काळकुंटे, पोलीस नायक बाळासाहेब देविदास आखाबरे, पोलीस हवालदार संतोष भगवानराव गित्ते यांचा समावेश आहे.

आणखी वाचा

संतोष देशमुखांना संपवल्यानंतर सुदर्शन घुले आसऱ्यासाठी भिवंडीत सोन्या पाटलांकडे पोहोचला पण सगळा प्लॅनच फसला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरणNagpur Hindu Sanghatna| नागपुरात संचारबंदी असताना हिंदू संघटनांकडून एकत्र येऊन नारेबाजी व आंदोलनABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
Embed widget