Nagpur Crime: पोटच्या मुलीचा जीव घेतला, अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं प्रियकराच्या साथीनं मातीत पुरलं, आईसह प्रियकर अटकेत
पोलिसांनी तपासाची सुत्र फिरवून प्रकरणाचा छडा लावला. त्यात प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या 3 वर्षीय चिमुकलीचा तिची आई व प्रियकरानेच काटा काढल्याचे समोर आले.
Nagpur Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याचं लक्षात येताच आईनेच पोटच्या 3 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा येथे ही घटना घडली असून प्रियकराच्या मदतीनं चिमुकलीला मातीत पुरल्याचं समोर आल्याने मोठी खळबळ उडाली. कुटुंबियांच्या संशयाच्या आधारावर या प्रकरणाची तक्रार दाखल करत मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी मृत मुलीच्या आईसह प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मानसी ताराचंद चामलाटे (3) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. तर मानसी आई गुणिता चामलाटे (29) व तिचा प्रियकर राजपाल मालवीय (32) जि. उज्जैन (मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
नक्की घडले काय?
गोंदियातील गोरेगांव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथील ताराचंद चामलाटे याला दोन पत्नी होत्या. त्यापैकी गुणिता चामलाटे ही दुसरी पत्नी होती. गुणिता चामलाटे हिला एक मुलगा, एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी ताराचंद चामलाटे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुणिता चामलाटे ही महिला दोन्ही अपत्यांना घेऊन रोजगारासाठी नागपूर येथील खापरखेडा येथे गेली होती. अचानक 27 डिसेंबरला गुणिता चामलाटे ही 3 वर्षीय चिमुकली मानसी चामलाटे हिचा मृतदेह घेवून अंत्यसंस्कारासाठी पालेवाडा/हेटी दाखल झाली.
कुटुंबियांच्या संशयातून तक्रार दाखल
आप्तेष्ठितांच्या उपस्थितीत मानसीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मानसीच्या मृत्यूला घेवून कुटूंबियांकडून संशय व्यक्त करण्यात आला. संशयाच्या आधारावर मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे हिने 27 डिसेंबरच्या रात्री गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या समक्ष हेटी येथील स्मशानभूमीत मातीत पुरलेले मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृतदेहाचा विसरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
आई अन् प्रियकरानंच काढला 3 वर्षीय चिमूकलीचा काटा
गोरेगाव पोलिसांनी गुनिता ताराचंद वामलाटे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर मानसीचा मृत्यू खापरखेडा (जि. नागपूर) पोलिस ठाण्यातंर्गत झाल्याने प्रकरण खापरखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी तपासाची सुत्र फिरवून प्रकरणाचा छडा लावला. त्यात प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या 3 वर्षीय चिमुकलीचा तिची आई व प्रियकरानेच काटा काढल्याचे समोर आले. दरम्यान दोन्ही आरोपीना खापरखेडा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचा: