एक्स्प्लोर

Praveen Darekar: आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी; उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत देताच भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....  

आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Praveen Darekar on Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. तर बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर आज भेट झाली. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षदा टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

अशातच आता भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया आली असून उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी त्यांच्याच भिनली आहे आहे. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंट मधून झाला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी केलं आहे.    

भाजप आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरु आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोकं फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. त्यामुळे आता आपलं कसं होणार? हेच आजच्या इव्हेंटवरुन दिसतंय असेही  भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी- प्रविण दरेकर 

दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली राज ठाकरे मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते, एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, वर कोण बसायचं यावरुन सगळे कन्फ्यूज होते. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता. उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी भिनली आहे. अशी टीका ही प्रविण दरेकर यांनी केली आहे.

मराठीला अभिजात दर्जा फडणवीस साहेबांच्या प्रयत्नानेच मिळाला- प्रविण दरेकर 

मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार मोठे केलेत आणि किती मराठी होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना किती मराठी माणसाचे हित जपले? सरकार मराठी माणसांच्या हितासाठी आपल्याला समर्थन देईल, यात दुमत नक्कीच नाही. भाजपनं सुद्धा मराठी माणसासाठी भूमिका घेतली आहे. अभिजात दर्जा देखील फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. मराठी भाषा भवन तुमच्या काळात उभं राहू शकलं नाही हे देखील सत्य आहे असेही भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. 

भाषेसाठी नाही ही तर, निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी- आशिष शेलार

महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता 'भाऊबंदकी'आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले, त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे.  असेही ते म्हणाले. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न! असेही ते म्हणाले. 

आणखी वाचा

मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले

व्हिडीओ

Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
Embed widget