Adipurush Release Date : प्रतीक्षा संपली; प्रभासच्या 'आदिपुरुष'ची रिलीज डेट अखेर ठरली; 'या' दिवशी होणार रिलीज
Adipurush : प्रभासचा बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' हा सिनेमा येत्या जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Adipurush Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आदिपुरुष' कधी होणार रिलीज? (Adipurush Release Date)
टी-सीरिजने सोशल मीडियावर भूषण कुमार आणि ओम राऊतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी 'आदिपुरुष'ची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. हा सिनेमा 16 जून 2023 रोजी 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज डेट जाहीर करण्याआधी भूषण आणि ओम राऊतने वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आहे.
View this post on Instagram
प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज करण्यात येईल असे सांगण्यात आले. पण अखेर आता हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिलीजआधीच 'आदिपुरुष' अडकला वादाच्या भोवऱ्यात
'आदिपुरुष' या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच या सिनेमातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
'आदिपुरुष' या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. हा पौराणिक शैलीतील सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर भूषण कुमारच्या टी-सीरिजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाकाळात ओम राऊतने या सिनेमावर काम केलं आहे. आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे.