एक्स्प्लोर

Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair: 'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा वडिलांबाबत खळबळजनक खुलासा

Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair: महेश भट आणि सोनी राजदान या दाम्पत्याला शाहीन भट आणि आलिया भट या दोन मुली आहेत. यापूर्वी अनेकदा महेश भट यांच्या दुसऱ्या लग्नाचे आणि अफेअर्सचे किस्से आपण ऐकले आहेत. 

Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair: नव्वदचं दशक गाजवणारी सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhat) म्हणजे, दिग्गज दिग्दर्शक महेश भट (Mahesh Bhat) मोठी यांची मुलगी. महेश भट यांनी दोन लग्न केलीत, त्यातल्या पहिल्या पत्नी किरण भट यांच्यापासून झालेली मुलगी पूजा भट, तर एक मुलगाही आहे, त्याचं नाव राहुल भट. त्यानंतर महेश भट यांनी दुसरं लग्न केलं, अभिनेत्री सोनी राजदान यांच्याशी. महेश भट आणि सोनी राजदान (Soni Razdan) या दाम्पत्याला शाहीन भट आणि आलिया भट या दोन मुली आहेत. यापूर्वी अनेकदा महेश भट यांच्या दुसऱ्या लग्नाचे आणि अफेअर्सचे किस्से आपण ऐकले आहेत. 

अभिनेत्री पूजा भटनं नुकतीच विक्की लालवानीच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना पूजा भट हिनं वडील महेश भट, नी राझदान आणि कौटुंबिक संबंधांविषयी मनमोकळेपणानं भाष्य केलं. यापूर्वीही पूजा भट अनेक मुलाखतींमध्ये आपल्या वडिलांबद्दल आदर व्यक्त करताना दिसते. नातं संपल्याचं जाणवल्यानंतर त्यांनी नात्यात खोटेपणा न ठेवता स्पष्ट निर्णय घेतला, यासाठी त्या महेश भट यांचा सन्मान करतात, असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

वडिलांच्या अफेअरबाबत काय म्हणाली पूजा भट? (Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair With Soni Rajdan)

पूजा भटनं मुलाखतीत बोलताना वडील महेश भट यांच्या अफेअरबद्दल खुलासा केला. पूजा भट म्हणाली की, "सोनी राजदान यांच्याबद्दल मला आधीच माझ्या आईकडून समजलं होतं. माझ्या वडिलांनी झोपेतून उठवत मला त्यांच्या अफेअरबद्दल सांगितलं होतं. मला आठवतंय ते म्हणाले होते की, मला एक महिला आवडते आणि मी घर सोडून जाणार आहे. पण, त्याचा असा अर्थ नाही की, माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल. मी नेहमी तुझ्यासोबत असेन... अनेक जण मला बोलायचे की, एवढ्या लहान वयात तुझ्या वडिलांनी तुला हे सगळं सांगितलं? पण, ते मला नाही सांगणार तर मग कोणाला सांगतील? कारण कुणा दुसऱ्याकडून या गोष्टी ऐकण्यापेक्षा माझ्या आई किंवा वडिलांकडून या गोष्टी समजलेल्या केव्हाही चांगलं..."

पूजा भट सावत्र आई सोनी राजदान यांच्याबद्दलही भाष्य केलंय. पूजा भट म्हणाली की, "एक दिवस सोनी राजदान मला म्हणाल्या होत्या की, त्यांना यासाठी अपराधी वाटतंय. पण तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, यात तुमचा दोष नाही. एका मजबूत नात्याला कोणी तिसरा व्यक्ती तोडू शकत नाही. कारण, नातं मजबूत असेल तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला त्यात जागा नसते. नात्यात काहीतरी कमतरता असते, तेव्हाच ती तिसरी व्यक्ती येऊन ती पूर्ण करते...", असं पूजा भटनं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Danny Pandit Reel With Dhanashree Verma: डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget