एक्स्प्लोर

Yugendra Pawar : अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठात शिक्षण, फलटणच्या कारखान्याची जबाबदारी, विद्या प्रतिष्ठाणचे खजिनदार; कोण आहेत युगेंद्र पवार?

Yugendra Pawar, बारामती  :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Yugendra Pawar, बारामती  :  बारामती कोणाची घरातील सर्वात ज्येष्ठ शरद पवारांची? की वेगळी चूल मांडणाऱ्या अजित पवारांची? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बारामतीकरांनी याआधी लोकसभेला ईव्हीएमचं बटण दाबलं होतं. आणि आता पुन्हा एकदा बारामतीकरांना त्यांचा राजकीय कैवारी म्हणून कोणत्या पवारांना विधानसभेत पाठवायचं? हे ठरवायचंय.

होय...चर्चा आता चर्चा राहिलेली नाही. ती खरी ठरलीय. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उभे राहिलेत.  बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत अजितदादांनीच तशी वक्तव्य केली. मात्र त्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता अजित पवार बारामतीतून विधानसभा लढताहेत. अजितदादांच्या नावाची घोषणा होईपर्यंत शरद पवारांनी देखील पत्ता उघड केला नव्हता..

लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी जरी उमेदवार असल्या, तरी खरी लढाई ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होती. आणि ही लढाई शरद पवारांनी जिंकली. आता तर स्वतः अजित पवार मैदानात आहेत. आजवरचा विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर नावाप्रमाणे दादा बारामतीत अजितच राहिले आहेत. 

युगेंद्र पवार कोण आहेत? 

युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. जन्म तारीख - 22 एप्रिल 1991 रोजी झालाय. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचं शिक्षण घेतलंय. ते  शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत. 

अजितदादांची कारकिर्द - 

अजित पवार 1991 पासून सलग सातवेळा बारामतीची आमदार आहेत. पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी अजित पवारांची 30 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. अजित पवारांचा हा बायोडाटा वाचल्यानंतर कोणता? नवखा उमेदवार बारामतीच्या आखाड्यात उतरेल. पण हे धाडस करणार आहे युगेंद्र पवार..कारण त्यांचा गॉडफादर आहे.. शरद पवार आहेत. शरद पवार काय चीज आहे हे अजितदादांनाही माहिती आहे... आणि अजितदादा किती बडी आसामी आहे हे शरद पवार देखील चांगलेच ओळखून आहेत..म्हणूनच यंदाच्या बिग फाईटमधली सर्वात टॉपवर बारामती असणार आहे.  आता शरद पवारांनी अजितदादांविरोधात ज्या नातवाला उतरवलंय, त्या युगेंद्र पवारांविरोधात जाणून घेऊयात

शरद पवार असो किंवा अजित पवार या दोघांसाठी यंदाची बारामतीची निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे? हे शब्दात सांगणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. आता लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजितदादांनी कोणती रणनीती आखली आहे. आणि अजितदादांना पराभवाचा चेहरा दाखवण्यासाठीशरद पवार कोणता डाव टाकणार? याकडे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या राजकीय पंडिताचं लक्ष असेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal Net Worth : स्वत:च्या नावावर ट्रॅक्टर, पत्नीकडे पिकअप, 585 ग्रॅम सोनं ते शेतजमीन; छगन भुजबळांची संपत्ती किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget