मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा विरोधी पक्षांचा चेहरा कोण? नितीश कुमार म्हणाले...
Who Will Be Opposition's PM Candidate: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. चार दिवसाच्या या आपल्या दौऱ्यात त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि अरविंद केरीवाल यांच्यसह अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली.
Who Will Be Opposition's PM Candidate: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. चार दिवसाच्या या आपल्या दौऱ्यात त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि अरविंद केरीवाल यांच्यसह अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ते विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. अशातच विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. यावरच आता नितीश कुमार यांनी भाष्य केलं आहे.
पाटणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात नितीश कुमार म्हणाले आहेत की, जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्रित येतील, त्यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवारही निवडला जाईल. ते म्हणाले, सोनिया गांधी या एकदा देशात परतल्यानंतर मी त्यांना भेटण्यासाठी पुन्हा दिल्लीला जाणार आहे. अलीकडच्याच माझ्या दिल्ली दौऱ्यात मी अनेक विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत नितीश कुमार म्हणाले की, दोन धर्मांमध्ये काहीतरी घडले पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही बापूंना मानणारे लोक आहोत. ते म्हणाले की, बिहारमध्ये किती काम झाले आहे. कुठे आहे जंगलराज? जंगलराज नाही, जनता राज चालू आहे. देशात असे एकही राज्य नाही की जिथे कोणत्याना कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही.
देशात पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता नितीश कुमार म्हणाले की, वेळ आल्यावर कळेल. राहुल गांधी यांच्याशी चांगली चर्चा झाली. देशाच्या विकासात काहीही होत नाही, असे सर्वांनाच वाटू लागले आहे. त्यामुळे सर्वांनी वेगवेगळ्या राज्यात एकत्र आल्यास चांगली परिस्थिती निर्माण होईल. इथे आता एकत्र सात पक्ष आहेत आणि ते एकच उरले आहेत.
नितीश कुमार पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाली आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आले तर चांगले होईल. सगळे एक झाले तर चेहरा ठरेल, पण मी पंतप्रधानपदाचा चेहरा नाही. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे देखील आघाडीवर असून तेही विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
India China Disengagement : भारत-चीनचा मोठा निर्णय! लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंटवरून दोन्ही देशांच्या सैन्याची माघार
Aadhaar Voter ID linking : तुमचे मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करा! घर बसल्या देखील करू शकता हे काम