India China Disengagement : भारत-चीनचा मोठा निर्णय! लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंटवरून दोन्ही देशांच्या सैन्याची माघार
India-China Army In Ladakh : लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंट 15 (PP-15) परिसरातून भारतीय आणि चिनी सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली आहे.
India-China Army In Ladakh : भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लडाख ( Ladakh) सीमेवरील तणाव मिटला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेनंतर या वादावर तोडगा निघाला असून आता गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंट 15 (PP-15) परिसरातून भारतीय आणि चिनी सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16 व्या फेरीतील यशस्वी चर्चेनंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
India, China begin disengagement in Gogra-Hot springs area of LAC in Ladakh
— ANI Digital (@ani_digital) September 8, 2022
Read @ANI Story | https://t.co/fmxQPVbOMC#IndiaChina #GograHotSprings #Ladakh #Disengagement #LAC pic.twitter.com/YPdm94tCUh
गेल्या दोन वर्षांपासून LAC वर दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता. लडाख सीमेवरील वाद मिटला असताल तरी डेपसांग प्लेन आणि डेमचोक सारख्या जुन्या फ्लॅश पॉइंट्सवर अजूनही तणाव कायम आहे. आज झालेल्या 16 व्या फेरीच्या बैठकीत दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16 व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार आज गोगरा-हॉटस्प्रिंग्स (PP-15) परिसरात भारतीय आणि चिनी सैन्याने समन्वित आणि नियोजनबद्ध पद्धतीने माघार घेतली. परस्पर समन्वयाने सैन्य मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा निर्णय म्हणजे सीमावर्ती भागात शांततेसाठी पोषक आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16 व्या फेरीची बैठक पार पडली. या बैठकीतील यशस्वी चर्चेनंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी सन्मवयातून या वादावर मार्ग काढला आहे.
एप्रिल-मे 2020 मध्ये चीनच्या सैन्याने सीमेवर अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. यातून मोठा तणाव निर्माण झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही देशांमधील या घटनेमुळे संबंध ताणले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील नुकतेच म्हटले होते की, सध्या भारत आणि चीनमधील संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. गलवान खोऱ्यातील घटनेवरून जयशंकर यांनी दोन्ही देशांमधील संबंधांवर भाष्य केले होते.