एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात, माझ्याकडे इनपुट्स : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on Abhishek Ghosalkar : "माझ्याकडे इनपुट्स आहेत, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता आहे. हा प्रवक्ता महिला आहे की पुरुष हे चौकशीत समोर येईल. त्यासाठी ही चौकशी निप:क्ष होणे आवश्यक आहे", असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागूपर : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. "माझ्याकडे इनपुट्स आहेत, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता आहे. हा प्रवक्ता महिला आहे की पुरुष हे चौकशीत समोर येईल. त्यासाठी ही चौकशी निप:क्ष होणे आवश्यक आहे", असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली.

यावर आता विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? 

राज्यात नावाला सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिली नाही. या घोटाळेबाज आणि वसुलीबाज सरकारचा हा परिपाक आहे. गेल्या महिना-दोन महिन्यातील घटना बघता, गुंडांचा मुक्त संचार आपल्या राज्यात होताना दिसतोय. घोसाळकरांवर झालेला हल्ला, हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला हा माझा स्पष्ट आरोप आहे. तेथील काही नेते त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांची हत्या करण्यासाठी भाग पाडलं. ज्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तो पूर्णप्लॅन कट होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, हे फार मोठं षडयंत्र आहे. सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ते आहेत, पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ते पुरुष आहेत की महिला आहेत ते लवकरच कळेल, त्यांनी रचलेल्या कटाचा बळी घोसाळकर गेलेला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

यापूर्वीच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं आहे, सत्ताधारी आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो, माहीममध्ये दादरमध्ये गणपती उत्सवामध्ये खुलेआम गोळीबार केला जातो.  पोलीस हमारे साथ है सरकार हमारे साथ है हमारा कोण बाल बाका कर सकता है, या मस्तीमध्ये, गर्मीमध्ये ही सगळी मंडळी वावरताना दिसत आहे. 

आपण पाहिले की पुण्यामध्ये सुद्धा  नवीन सीपी गेलेत आणि सगळ्यांना तंबी दिल्यानंतरसुद्धा गुंडांची मस्ती उतरली नाही. परत त्याच पद्धतीने त्यांनी दादागिरी सुरू केली. गुंडगिरी सुरू केली एकूणच राज्य आता बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षाही वाईट अवस्था दिवसेंदिवस  होत चाललेली आहे. याला सर्व सत्ताधारी कारणीभूत आहे आणि मला वाटतं की राज्य वाऱ्यावर सोडून हे सत्ता टिकवण्यासाठी आणि संपत्तीसाठी फक्त खुर्चीचा वापर करत आहेत यापलीकडे यांच्या डोक्यात महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या हितासाठी यांना काहीही देणे घेणे नाही. 

या हत्येच्या संदर्भातली चौकशी झाल्यानंतर आणि ही सर्व चौकशी अत्यंत निपक्ष होणे आवश्यक आहे. त्यातून आपल्याला मी म्हणालो तसं सत्ताधारी पक्षातील मोठी महिला किंवा पुरुषाचं नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही. कारण वर्चस्वाच्या लढाईतून घोसाळकरसारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवलं आहे.  मी चौकशीच्या पूर्वी कोणाचं नाव घेणे योग्य होणार नाही. चौकशीमध्ये जे आमच्याकडे इनपुट आले आहेत, त्यातून मी बोलतो आहे. चौकशीमध्ये निष्पन्न होईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

Vijay Wadettiwar on Abhishek Ghosalkar Video : विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

Vijay Wadettiwar : अभिषेक घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा महिला किंवा पुरुष प्रवक्ता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं बोट कुणाकडे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha MVA : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यताHarshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Embed widget