(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हायक्लास लोकवस्ती असलेल्या 'मलबार हिल'पासून बोरीवलीपर्यंत; मुंबईतील 18 जागांवर काँग्रेस आग्रही, पाहा यादी!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मतदार राजा यंदा कोणाच्या पारड्यात सत्ता देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा तिढा लवकरच सोडवण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस उच्चभ्रू मतदारसंघ असलेल्या मलबार हिलसाठी देखील आग्रही आहे.
मुंबईतील 18 जागांवर काँग्रेस आग्रही-
1) धारावी
2) चांदिवली
3) मुंबादेवी
4) मालाड पश्चिम
5) सायन कोळीवाडा
6) कुलाबा
7) कांदिवली पूर्व
8) अंधेरी पश्चिम
9) वर्सोवा
10) वांद्रे पश्चिम
11) घाटकोपर पश्चिम
12) कुर्ला
13) भायखळा
14) जोगेश्वरी पूर्व
15) मलबार हील
16) माहीम
17) बोरीवली
18) चारकोप
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत काय चित्र होतं?
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
विधानसभा निवडणुकीसाठी मविआचं प्लॅनिंग, मुंबईतील 36 मतदारसंघांचं जागावाटप कसे होणार? जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती https://t.co/mYhK0eHUbW #MVA #vidhansabhaelection2024 #maharashtraassemblyElection2024 #Mumbai #ThackerayCamp
— ABP माझा (@abpmajhatv) September 14, 2024
2019 मध्ये मुंबईत कोणी किती जागा जिंकलेल्या?
2019 च्या मुंबई विधानसभेत शिवसेनेनं महायुतीच्या 36 पैकी 19 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेसनं 28 जागांवर निवडणूक लढवली होती, पण पक्षाला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीनं एका जागेवर तर समाजवादी पक्षानं एक जागा जिंकली. उर्वरित 11 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यंदा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत 36 जागांसाठी घमासान होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेच्या जागांवर महानगरपालिका निवडणुकीची गणितं अवलंबून असतात. अशातच मुंबई विधानसभेत जो बाजी मारणार, महानगरपालिकेत त्याचा विजयाचा मार्ग मोकळा होणार, हे मात्र नक्की.
संबंधित बातमी:
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी