एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election Result 2024 : मुंबई शिक्षक, पदवीधरमध्ये ठाकरेंचाच बोलबाला; नाशिकचा गड शिंदेंनी राखला; चारही जागांचा A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर

Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईमध्ये ठाकरेंचाच बोलबाला दिसून आला.

Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT Camp) उमेदवार अनिल परब (Anil Parab) यांनी बाजी मारली. तर शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर (Jagannath Abhyankar) यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंचाच बोलबाला दिसून आला. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने (BJP) विजयाचा गुलाल उघळला असून येथे भाजपचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Camp) किशोर दराडे (Kishor Darade) विजयी झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकचा गड कायम राखला आहे. पाहा A टू Z निकाल...

मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी 

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या (Mumbai Graduate Constituency) निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदान झाले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली होती. 3 हजार 422  मते अवैध ठरली होती. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी  32 हजार 112 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजयी घोषित करण्यात आले.

मुंबई शिक्षक मतदारसंघात ज. मो. अभ्यंकर यांनी मारली बाजी 

मुंबई शिक्षक मतदारसंघात (Mumbai Teachers Constituency) पंचरंगी लढत झाली. या मतदारसंघात ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदेसेना पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते. यात बाराव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मतं मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले. 

कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांची विजयाची हॅटट्रिक

कोकण पदवीधर मतदारसंघात (Kokan Graduate Constituency) भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मतं वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मतं मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना विजयी घोषित करण्यात आले. निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे सलग दुसऱ्यांदा विजयी 

नाशिक शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency) शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. किशोर दराडे हे कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची  5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 

आणखी वाचा 

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फRohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Embed widget