Vidhan Parishad Election Result Live Updates : अनिल परब यांनी बाजी मारली, पण नाशिकमध्य मतमोजणी सुरूच, उमेदवारांत धाकधूक!
Vidhan Parishad Result Updates : आज विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
LIVE
Background
मुंबई : सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. पुण्यात नुकतेच घडलेले पोर्शे कार अपघात प्रकरण, सापडलेले ड्रग्ज, पोलीस भरती, शेतकऱ्यांसाठी मदत या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना रोखठोक सवाल करत आहेत. तर सत्ताधारीही पूर्ण तयारी करून विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अधिवेशन होत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे आज अधिवेशनादरम्यान काय काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. तर नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अद्याप चालूच आहे. एकूण चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. या घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट वाचा एका क्लीकवर...
Nashik Teachers Vidhan Parishad Election Result : मोठी बातमी! नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी, शिंदेंच्या शिवसेनेचा बोलबाला
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीचे संदीप गुळवेदेखील बाद झाले. विजयासाठी 31 हजार 576 चा कोटा निश्चित करण्यात आला होता. विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक होती.
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमजोणी सुरूच, मविआचे संदीप गुळवे बाद, किशोर दराडे आघाडीवर
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक
- पहिल्या पसंतीत विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानं, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू
-
- तब्बल 24 तासांपासून नाशिकमध्ये मतमोजणी सुरूच
-
- पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर
- बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार बाद
- माहाविकास आघाडीचे संदीप गुळवेदेखील झाले बाद
- विजयासाठी 31 हजार 576 चा कोटा निश्चित
-
- विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक
- अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि दराडे यांच्या सुरू आहे रस्सीखेच
Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा विजय निश्चित
मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांचा विजय निश्चित झाला असून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मतदारांनी
भाजपला नाकारून अनिल परब यांना निवडून दिले यात आनंद असल्याचे वरून सरदेसाई यांनी सांगितले.
Vidhan Parishad Election Result : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरेंची मोठी आघाडी
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांची मोठी आघाडी
निरंजन डावखरे यांना ३५ हजार मत तर रमेश कीर यांना ७ हजार मतं
मतमोजणीचा एक राऊंड, पूर्ण आणखी दोन राऊंड बाकी
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत चुरशीची लढत
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू
पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात काटे की टक्कर
सर्वच टेबलवर सुरू आहे चुरशी लढाई
तीनही उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच