एक्स्प्लोर

BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

BEST Election Result: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.

BEST Election Result मुंबई: सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत 'ठाकरे ब्रँड'चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले.

महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. 'ठाकरे ब्रँड' म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र आज पहाटे निकाल लागला आणि ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अशा निवडणुकांचं राजकारण करण्यात येऊ नये. ही पतपेढीची निवडणूक आहे. त्यात काही मोठं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  तसेच या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी राजकारण केलं. त्यांच्या राजकारणाला जनतेनं उत्तर दिलंय. या साध्या निवडणुकीतही जनतेनं त्यांना नाकारलं आहे. मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. शशांक राव आणि प्रसाद लाड देखील आमचेच आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?

पैशाचा वापर निश्चित झाला. पराभव झाला हे आरोप केले तरी टिका केली जाते. पैशांचा वापर झाला हे मी निवडणूकीपूर्वीच पुराव्यानिशी दाखवलं, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच ईओडब्ल्यूच्या नोटीसा आल्या. आता 15 लाखांत घर कशी देणार हे आम्ही बघतोय. जिंकल्यावर काही हळद्या हळकुंटाने पिवळी होणारी माणसं असतात. येवढी ताकद लावून 7 आले त्याचं आत्मपरीक्षण करायला हवं. पतपेढीच्या निवडणूकीवरून लिटमस्ट टे बोलू नये तर्क लावू नये. युद्ध अजून संपलेलं नाही, असंही संदीप देशपांडे म्हणाले. प्रसाद लाडांना एवढचं त्याच्या गुरूचं वाक्य सांगेन. मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना समंदर हू लोटकर वापर आऊंगा. प्रसाद लाड यांना वेळ आलं की कळेल. राव यांना अप्रत्यक्ष मदत झाली असेलते स्वत: तसं म्हणत आहेत. मुंबई बॅकेची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक ही सारखी नसते.  मनसेने पहिल्यांदा पतपेढीची निवडणूक लढवली. आम्ही चांगली फाईट दिली, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणाले?

ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. काय झालंय हे माहित होत नाही तोपर्यंत बोलणार नाही. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत. यात कुणाला मोठं यश मिळालंय किंवा अपयश मिळालंय, असं वाटत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

ठाकरे बंधू बेस्ट पतपेढी निवडणूक का हरले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? 'या' गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget