एक्स्प्लोर

Stocks to Watch: शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स निफ्टीवर 21 ऑगस्टला 'या' सात स्टॉकवर लक्ष ठेवा, कमाईची संधी 

Stocks to Watch: भारतीय शेअर बाजारात 18 ऑगस्टपासून तेजी पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले.  

मुंबई: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 213.45 अंकांच्या तेजीसह 81857.84 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 69.90 अंकांची वाढ होऊन तो 25050.55 वर बंद झाला. भारतीय शेअर बाजारातील तेजीचा परिणाम गुरुवार (21 ऑगस्ट) रोजी दिसून येऊ शकतो. गुरुवारी काही स्टॉक्समध्ये जोरदार घडाोडी पाहायला मिळू शकतात. टेलिकॉम, रेल्वे, वाईन, बॅटरी, सीमेंट आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील 10 स्टॉक्समध्ये घडामोडी पाहायला मिळू शकतात.  

रेलटेल (RailTel)

टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ओडिसा आणि केरळमध्ये सरकारी यंत्रणांकडून एकूण 50.42 कोटी रुपयांच्या दोन वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. रेलटेलचा शेअर बुधवारी 0.02 टक्क्यांच्या किरकोळ तेजीसह 359.20 रुपयांवर बंद झाला.  

ज्युपिटर वॅगन्स (Jupiter Wagons)

रेल्वे फ्रेट वॅगन निर्माता कंपनी  Jupiter Wagons ची अनलिस्टेड सहायक कंपनी  Jupiter Tatravagonka Railwheel Factory Private Limited ला वंदे भारत ट्रेनसाठी  व्हीलसेट पुरवठ्याचं लेटर ऑफ इंटेंट मिळालं आहे. हे पत्र 19 ऑगस्ट 2025 ला जारी करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 5376 व्हीलसेटसचा पुरवठा करायचा असून त्याचं मूल्य 215 कोटी रुपये आहे.  

अल्ट्राटेक (UltraTech)

अल्ट्राटेकनं इंडिया सिमेंटसमधील 2.01 कोटी इक्विटी शेअर विक्रीला मंजुरी दिली आहे. कंपनीतील 6.49 टक्के भागदारीच्या बरोबर आहेत. ही विक्री ऑफर फॉर सेलद्वारे केली जाईल. यानंतर अल्ट्राटेक सिमेंटची इंडिया सिमेंटमध्ये भागीदारी 75 टक्के राहील. 

एक्साईड इंडस्ट्रीज (Exide Industries)

बॅटरी उत्पादक एक्साइड इंडस्ट्रीजनं त्यांची सहायक कंपनी एक्साइड एनर्जी सोल्यूसन्स लिमिटेडमध्ये राइट्स इश्यू च्या माध्यमातून 100 कोटींची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक 2.5 कोटी शेअर्या माध्यमातून 10 रुपयांचा शेअर 30 रुपयांच्या प्रिमियम वर घेण्यात आला. 

सुला वाईनयार्डस (Sula Vineyards)

भारतातील सर्वात मोठी वाईन निर्मिती आणि विक्री करणारी कंपनी सुला वाईन यार्डस प्रिमियम स्पिरिटस सेगमेंटमध्ये विस्तार करण्याचं नियोजन करत आहे. कंपनी दोन ते तीन छोट्या ब्रँडस सोबत अधिग्रहणाबाबत चर्चा करतेय, त्यामुळं कंपनीची व्हिस्की, स्कॉच आणि वोडका कॅटेगरीत एंट्री होऊ शकते.  

टायटन (Titan)

टाटा ग्रुपच्या टायटन कंपनी लिमिटेड ने सांगितलं की पी बी बालाजी यांनी 20 ऑगस्टला  कंपनीच्या नॉन- एक्झिक्यूटिव्ह आणि नॉन इंडिपेंडेंट संचालक पदावरुन राजीनामा दिला आहे. बालाजी म्हणाले की त्यांनी त्यांच्या इतर कामांमुळं त्यांना या कामात पूर्ण वेळ देता येत नव्हता.    

झी एंटरटेनमेंट ( Zee Entertainment)

झी एंटरटेनमेंटनं म्हटलं की आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडनं दिल्ली हायकोर्टात एक याचिका केली आहे. कंपनी विरोधातील सर्व दाव्यांना फेटाळ्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. 12 मेच्या अंतिम निर्णयानुसार एबीएफएलचे सर्व दावे फेटाळले गेले होते. हे प्रकरण 134 कोटींच्या टर्म लोनशी संबंधित होते.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Embed widget