Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
Sumeet Raghavan On Poor Road Conditions: गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण पेटल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर, त्यापूर्वी दादरचा कबुतरखाना बंद केल्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला.

Sumeet Raghavan On Poor Road Conditions: गेल्या चार ते पाच दिवसांत पावसानं मुंबईसह (Mumbai Rains) उपनगरांत थैमान घातलं. अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे मुंबई (Mumbai Rain Updates) ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच त्यानंतर रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, घाणीचं साम्राज्य यांसारख्या प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. याच मुद्द्यावरुन आता मराठमोळा अभिनेता सुमित राघवननं (Marathi Actor Sumit Raghavan) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांना घेरलं आहे. इतरवेळी आपलं रोखठोक मत मांडणाऱ्या समित राघवननं सोशल मीडियावर पोस्ट करुन दोन्ही नेत्यांना टॅग करुन एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण पेटल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर, त्यापूर्वी दादरचा कबुतरखाना बंद केल्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला. आजही दादरच्या कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेत आहे. याच सर्व प्रकरणांचा उल्लेख करत सुमित राघवननं (Sumit Raghavan) संताप व्यक्त करत रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं आहे. तसेच, त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीवर 'डिजिटल इनोव्हा आफ्रिका' नावाच्या पेजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक वेगळं तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या रस्त्यांची माहिती दिली आहे.
सुमितनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
सुमित राघवननं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधून त्यानं मुंबई आणि उपनगरांमधील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी खास पद्धतीचे रस्ते बांधण्यात आल्याचं दाखवलं गेलंय.
View this post on Instagram
सुमितनं इन्स्टाग्रामवर काय लिहिलंय?
अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडिओ @digitalinnovaafrica या इन्स्टाग्राम पेजवरील असून, रस्त्यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना जर्मनीमधील असल्याचा दावा यात करण्यात आला. रस्त्यावर पडणारे पाणी काही सेकंदांमध्ये कसं झिरपून जातं, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

"रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा आपल्या देशात आणि राज्यात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे... कृपा करून हे बघा.", असं म्हणत सुमित राघवननं थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्येही सुमित राघवननं आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं लिहिलंय की, "मी वर्षानुवर्षं हेच सांगतोय, कृपया ऐका..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























