एक्स्प्लोर
Jai Jawan Govinda Pathak: संदीप, दहीहंडी तूच फोडायची... अविनाश जाधव शोधत बसले, जय जवानने 10 थर लावल्यानंतर काय-काय घडलं?
Jai Jawan Govinda Pathak: जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात 10 थरांचा मनोरा रचत आपल्या दिवसाची यशस्वी सांगता केली.
Jai Jawan Govinda Pathak
1/12

जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने शनिवारी दहीहंडी उत्सवात तीनवेळा 10 थर रचून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
2/12

ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जय जवान पथकाने तिसऱ्यांदा 10 थर रचून आपल्या मोहीमेची यशस्वी सांगता केली.
3/12

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी जय जवानने 10 थर रचल्यानंतर एक जल्लोष केला. यावेळी त्यांनी प्रशिक्षक संदीप ढवळे यांचा हंडी फोडण्याचा आग्रह केला.
4/12

संदीप ढवळे यांनी अविनाश जाधव यांच्या विनंतीला मान देत दहीहंडी फोडली.
5/12

अविनाश जाधव हे पूर्णवेळ पावसात भिजत गोविंदा पथकांना प्रोत्साहन देत होते. जय जवान गोविंदा पथक 10 थर रचत असताना अविनाश जाधव त्यांचे मनोबल सातत्याने वाढवत होते.
6/12

जय जवान गोविंदा पथकाने रात्री धो-धो पाऊस सुरु असताना मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडीतही 10 थर रचले. यानंतर अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी स्टेजवरुन खाली उतरत जय जवान गोविंदा पथकासोबत गुलाल उधळत आनंद साजरा केला.
7/12

जय जवानने 10 थर लावल्यानंतर अविनाश जाधव हे स्टेजच्या खाली उतरून त्यांच्या जल्लोषात सामील झाले. यावेळी अविनाश जाधव यांनी 10 कडक थरचा लहानसा फलकही झळकवला.
8/12

जय जवान गोविंदा पथकाने घाटकोपर आणि ठाण्यात दोन ठिकाणी 10 थरांचा मनोरा रचून दाखवला.
9/12

जय जवान आणि कोकण नगर या दोन गोविंदा पथकांनी यंदा 10 थर रचण्याचा विक्रम केला आहे.
10/12

अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात 10 थर रचल्यानंतर जय जवान पथकाच्या गोविंदांनी एकच जल्लोष सुरु केला.
11/12

'आज आपण कितीवेळा 10 तर लावले, तीन वेळा लावले. आज हॅटट्रिक केली, ही हॅटट्रिक बापाची आहे. बाप हा बाप असतो', अशा घोषणा जय जवानच्या गोविंदांनी दिल्या.
12/12

त्यावर अविनाश जाधव यांनी माईक हातात घेत , सातबारा पण आपल्याच बापाचा आहे', असे म्हटले.
Published at : 17 Aug 2025 12:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























