नाशिकमध्ये दोन मजली इमारत कोसळली, मलाब्याखाली नागरिक अडकले, सहा ते सात जण जखमी
नाशिकच्या (Nashik) जुने नाशिक परिसरातील दोन मजली इमारत कोसळल्याची (building collapsed) घटना घडली आहे. या घटनेत सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
Nashik : नाशिकच्या (Nashik) जुने नाशिक परिसरातील दोन मजली इमारत कोसळल्याची (building collapsed) घटना घडली आहे. या घटनेत सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीच्या मलाब्याखाली नागरिक अडकल्याने जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केले आहे. घटनास्थळी पोलिस, स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनेत दोन लहान मुलांसह सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वदूर पाऊस सक्रिय झाला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले असून धरणातील पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच जिल्ह्यातील 14 धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. तर लहान मोठ्या 24 धरणातील पाणीसाठा देखील 85 टक्क्यांवर पोहोचला आहे.
अनेक भागात रेड व ऑरेंज अलर्ट जारी
राज्यात चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून अनेक भागात रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे जलसंपदा विभागाकडून देखील अनेक गावांना अलर्ट देण्यात आलेला आहे. तर गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 84.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास कधीही धरणातून पाणी सोडण्याचा इशारा दिला आहे. तर जिल्ह्यातील अन्य 11 धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:























