एक्स्प्लोर

Madha : मोहिते पाटलांनी नुसता होय म्हणावं, माळशिरसमध्ये दोन लाखांचं मताधिक्य देतो; माढ्यात कट्टर विरोधकाची साद, फडणवीसांची डोकेदुखी वाढली

Madha Lok Sabha Election : आधी मोहिते पाटलांची समजूत काढण्यात अपयश आलेल्या देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार हे निश्चित झाल्यानंतर भाजपाला आता दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी भाजपबाबत थेट नाराजी व्यक्त केली. मोहिते पाटील याना साथ देण्याची मानसिकता बनत असल्याचे वक्तव्य उत्तम जानकरांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केल्याने आता भाजपच्या अडचणी वाढण्यास सुरुवात होणार आहे. 

लोकसभेला मदत करून विधानसभेला साथ घ्यायची

माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे जेष्ठ नेते आणि जवळपास 70 ते 75 हजार मतांची ताकद असणारे उत्तम जानकर यांनी आज 'माझा'शी बोलताना आता मोहिते याना मदतीची गरज असताना त्यांना साथ द्यायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची मानसिकता झाल्याचे सांगितले. एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या आपल्याशी चर्चा करीत असले तरी भाजपकडून आपली सातत्याने फसवणूक होत असल्याची भावना जानकरांनी व्यक्त केली.

माळशिरस तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीवर सत्ता असल्याचा दावा करणाऱ्या जानकर यांनी सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र या ठिकाणी माळशिरसाचे आमदार राम सातपुते याना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जानकर नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सागर बंगल्यावर एकदा जानकर आणि नंतर त्यांच्या 45 पदाधिकाऱ्यांच्या सोबत फडणवीस यांनी बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 

आमदारकी स्थानिकांना मिळावी

यावर बोलताना आता पुन्हा एकदा शेवटचे भेटण्यासाठी फडणवीस यांनी बोलावले असले तरी येत्या चार दिवसात 10 हजार प्रमुख  कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन यात निर्णय घेणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. आमदारकी आणि खासदारकी स्थानिकांना मिळावी ही कार्यकर्त्यांची भूमिका असून यापुढील सर्व निवडणुका अपक्ष लढविण्याबाबत दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोहिते पाटील-जानकर एकत्र येणार

या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मोहिते पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क साधत आपण आपले वर्षानुवर्षांची वाद संपवू अशी भूमिका घेत आहेत. अशीच भूमिका आपलेही कार्यकर्ते घेऊ लागल्याने माळशिरस मध्ये 2019 नंतर पुन्हा एकदा दोन्ही गटाचे एकत्रीकरण दिसू शकेल असे जानकर यांनी सांगितले. 

दोन लाखांचं मताधिक्य देणार

जर मोहिते आणि जानकर एकत्र आले तर एकट्या माळशिरस तालुक्यातून दीड ते दोन लाखांचे मताधिक्य मिळेल असा दावा केला आहे. आता येत्या चार दिवसात कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय फडणवीस यांना कळवण्यात येईल असेही उत्तमराव जानकर यांनी सांगितले .

उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेमुळे माढा लोकसभेची गणितं मोठ्या प्रमाणात बदलू शकणार असून भाजप समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात यावर माळशिरस तालुक्याची दिशा ठरणार आहे. जानकर यांची समजूत काढण्यात यश आल्यास भाजपाला दिलासा मिळू शकेल . 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Embed widget