UP Election : समाजवादी सरकारने दहशतवाद्यांवरील खटले मागे घेतले होते, योगी आदित्यनाथ यांचा गंभीर आरोप
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैनपुरी करहल येथे प्रचार सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी सपावर आरोप केला आहे की, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असताना त्यांनी दहशतवाद्यांवरील खटले मागे घेतेले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी यांनी दावा केला की, मैनपुरीमध्ये भाजप 4 जागा जिंकेल.
मैनपुरीच्या जाहीर सभेत योगी आदित्यनाथ म्हणाले, ''निवडणुकीच्या वेळी आम्ही राज्यातील सर्व बुलडोझरांना विश्रांती दिली आहे. पुन्हा सरकार स्थापन झाले की बुलडोझर चालू होईल. सपा सरकार आल्यावर त्यांनी पहिले काम केले ते म्हणजे दहशतवाद्यांवरील खटले मागे घेणे. काँग्रेस, सपा-बसपा यांनी 2014 पूर्वी संपूर्ण देशाची दुर्गती केली होती. संपूर्ण देशाचे नेतृत्व करणार्या उत्तर प्रदेशला या सरकारने तिथे आणून सोडलं जिथे आपल्या प्रदेशच्या स्वतःच्या अस्मितेचे संकट निर्माण झाले होते.''
अखिलेश यांच्या बालेकिल्ल्यात अमित अमित शहांची रॅली
योगी यांच्या प्रचार सभेच्या एक दिवस आधी गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांनी करहलच्या सपाच्या बालेकिल्ल्यात निवडणूक रॅली घेऊन अखिलेश यादव यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कुटुंबवाद आणि जातीयवादाचे राजकारण करणाऱ्यांपासून करहलच्या जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे अमित शाह यावेळी लोकांना संबोधित करताना म्हणाले होते. सपा आणि यादव कुटुंबाला त्यांच्याच बालेकिल्ल्यातील करहलमध्ये लक्ष्य करत शाह म्हणाले की, समाजवादी पक्ष आता फक्त नावाचा समाजवादी राहिला आहे. त्यांना गरिबांच्या हितांशी काहीही देणेघेणे नाही. संपूर्ण राज्यात सपाचा सफाया झाल्याचा दावा करत त्यांनी करहलच्या जनतेला कमळ फुलवण्याचं आव्हान केलं होत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha