Unmesh Patil on Girish Mahajan : गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे; उन्मेष पाटलांची टीका
Unmesh Patil on Girish Mahajan, जळगाव : गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे. हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत.
Unmesh Patil on Girish Mahajan, जळगाव : "गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे. हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत. जामनेरचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असले तरी त्यांनी दोन नंबरचे पैसे कमावले. त्यांना दोन नंबरच्या पैशाची यांची मस्ती आहे. दोन नंबर पैशातून या आठवड्यातून लक्ष्मी दर्शन होईल", अशी टीका ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर केली आहे. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
उन्मेश पाटील म्हणाले, भात उत्पादकाला बोनस देतात,पणं कापसाला नाही. गुजरात कांद्याला निर्यात परवानगी दिली जाते पणं आपल्या कांद्याला नाही. केळी कापूस आणि कांदा शेतकऱ्यावर अन्याय आहे. दारूच्या बाटलीवर महिलेचा फोटो लावण्यास सांगणाऱ्या गिरीश महाजनांना लाज वाटायला पाहिजे होती. हे निष्ठेच्या गोष्टी करत आहेत. आधुनिक इंग्रजांच्या विरोधात आसूड ओढण्याची गरज आहे. तोडी फोडीचं राजकारण हे करत आहेत. ही विजय सभा आहे. करण पवार यांना विजय करण्याचा संकल्प करा, असे आवाहनही उन्मेश पाटील यांनी म्हटले.
इकडची सेना खरी, तिकडची सेना गद्दारांची
माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, लोकांचा प्रतिसाद पाहता,जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून येतील याचा विश्वास आहे. इकडची सेना खरी,तिकडची सेना गद्दारांची आहे. संकट मोचकाने या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे. पालकमंत्री लक्ष देत नाही, देशात मोदी-शहांची हुकूमशाही आहे. राज्यात गिरीश महाजन आणि फडणीस यांची हुकूमशाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे खरबूज कापून खा. मागच्या वेळी स्मिता वाघ यांचे तिकीट कापले गेले, याचे सूत्रधार मंगेश चव्हाण आहेत. उन्मेष पाटील यांनी चांगले काम करून त्यांचे तिकीट का कापले?
शेतकऱ्यांची काम केली नाहीत, यांचा बदला घेतला पाहिजे
विकासच्या गप्पा करतात, शेतकऱ्यांची काम केली नाहीत, यांचा बदला घेतला पाहिजे. भाजपाच्या पाया खालची वाळू सरकली आहे. म्हणून व्यक्तिगत आरोप करतात. पोलीस आमच्या गाड्या अडवतात,सत्ताधारी यांच्या गाड्या मधे ड्रॅग सापडले तरी त्या तपासल्या जात नाही, असे आरोपही सतेज पाटील यांनी केले.