उद्धव ठाकरे हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार की नाहीत? राजू शेट्टी काय म्हणाले ?
Uddhav Thackeray and Raju Shetti : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
![उद्धव ठाकरे हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार की नाहीत? राजू शेट्टी काय म्हणाले ? Uddhav Thackeray will give candidates in Hatkanangle or not? What did Raju Shetty says Maharashtra Politics Marathi News उद्धव ठाकरे हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार की नाहीत? राजू शेट्टी काय म्हणाले ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/3bc031a20eda719edfea64291a6cab731711116217059924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray and Raju Shetti : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. हातकणंगलेमध्ये शिवसेनेचा खासदार होता. मात्र, धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर धैर्यशील मानेंचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे राजू शेट्टी यांना पाठिंबा देतील, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही.
हातकणंगलेमधून उमेदवार द्यायचा नाही, अशी ठाकरेंची मनस्थिती
राजू शेट्टी याबाबत बोलताना म्हणाले, महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या जागेच काय झालं हे मला माहित नाही. माझं काम चालूच आहे. महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर तिरंगी लढत होईल नाहीतर दुरंगी लढत होईल. उद्धव ठाकरे हे हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार नाहीत,अशी त्यांची मनस्थिती दिसतेय. शेवटी त्यांनी निर्णय घ्यायचा आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.
बीफ निर्यात करणाऱ्यांकडून इलेक्ट्रॉल बॉण्ड घेतात
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, बीफ निर्यात करणाऱ्यांकडून इलेक्ट्रॉल बॉण्ड घ्यायचे असे यांचे काम आहे. यांची कथनी आणि करणी यात फरक आहे. माझी मालमत्ता वाढली हे आताच कळालं. माझी वाढलेली मालमत्ता किती आहे ते दाखवा ती दान करतो. काही वेळ दानशूर व्यक्ती म्हणून तरी समाधान मिळेल.
रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहेत
मतदारांवर विश्वास ठेवून एकटा लढणार हे सांगण्याची हिंमत लागते. सुरुवातीला ही हिम्मत दाखवावी आणि मग माझ्यावर टीका करावी. माझी आणि नितीन गडकरी यांची भेट कशाबद्दल झाली हे टीका करणाऱ्यांनी सांगावे. सध्या रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहेत. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनच लोकसभा लढवावी असे आमचे मत आहे. तुमच्या गद्दारांना धडा शिकवायचा असेल, तर मला पाठिंबा द्यावा अशी साद राजू शेट्टी यांनी ठाकरे यांना घातली होती. शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांचा खणखणीत आवाज संसदेमध्ये जावा,अशी इच्छा असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेट्टी यांनी आतापर्यंत दोनवेळा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)