उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा घणाघाती आरोप; नेमकं काय म्हणाले?
Bhandara-Gondiya Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे आधी भाजपला सीट विकायचे आता काँग्रेसला विकतात, असा घणाघाती आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
![उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा घणाघाती आरोप; नेमकं काय म्हणाले? Uddhav Thackeray used to sell seats to BJP now he is selling them to Congress says MLA Narendra Bhondekar has accused Uddhav Thackeray Bhandara Gondiya Lok Sabha Election 2024 Marathi news उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा घणाघाती आरोप; नेमकं काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/24/a56be3ebb6c82da43a7a3560224e53d71711298496777322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भंडारा : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आधी भाजपला (BJP) सीट विकायचे आता काँग्रेसला (Congress) विकतात, विदर्भाची (Vidarbh) सीट विकून मुंबईची पाहिजे. ती सीट मागून घेतात, असा घणाघाती आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. शिवसेना मागील अनेक वर्षांपासून विदर्भावर अन्यायचं करीत आहेत. आम्हाला अनेकदा याचा अनुभव आलेला आहे. शिवसैनिकांवर जर न्याय द्यायला पाहिजे असेल तर, उद्धव साहेबांनी ती सीट लढवायला पाहिजे होती, असंही भोंडेकर यांनी म्हटलं आहे.
पूर्वी भाजपला सीट विकायचे आता काँग्रेसला विकतात
एकेकाळी विदर्भ आणि पूर्व विदर्भ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेला विदर्भात जागा मिळत होत्या. मात्र, आता महाविकास आघाडीसोबत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यातील जागांवर काँग्रेसने उमेदवार घोषित करताना शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतल्या आहेत. विदर्भातील रामटेक, अमरावती, यवतमाळ - वाशिम या जागा काँग्रेसच्या ताब्यात गेल्यानं शिवसेनेच्या वाट्याला भोपळा आला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी बीजीपीला सीट विकायचे आता काँग्रेसला विकतायत, असा आरोप भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकरांचा घणाघाती आरोप
नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले की, शिवसेना मागील अनेक वर्षांपासून विदर्भावर अन्यायचं करत आहेत. आम्हाला अनेकदा याचा अनुभव आलेला आहे. पूर्वी भाजपसोबत जेव्हा शिवसेना होती, उद्धव साहेबांची, त्यावेळी सुद्धा भाजप म्हणेल तसे उमेदवार द्यायचे, भाजप म्हणेल ती सीट घ्यायची. आजपण बघितले तरी रामटेक ही सीट शिवसेनेची पारंपरिक सीट आहे. शिवसैनिकांवर जर न्याय द्यायला पाहिजे असेल तर उद्धव साहेबांनी ती सीट लढवायला पाहिजे होती. मात्र, रामटेकची सीट काँग्रेसला देवून टाकली. पूर्व विदर्भात एकही सीट ठेवलेली नाही.
उद्धव साहेबांना हे शोभत नाही
अशाच सर्व सीट देवून टाकल्या तर, 2019 मध्ये एकही सीट आम्हाला ठेवलेली नव्हती आणि त्या बदल्यात एक्सपायरी डेटच्या दोन सीट घेतलेल्या होत्या. भाजप जे-जे म्हणायचं ते-ते करायचे आणि आता पण काँग्रेस जे जे म्हणते ते ते करायचं. हाच खरा चेहरा उद्धवजींचा आहे. पूर्वी भाजपला विकायचे आणि आता काँग्रेसला विकत आहे. विदर्भाची सीट विकून मुंबईची पाहिजे ती मागून घेतात. हा शिवसैनिकांवर अन्याय आहे. उद्धव साहेबांना हे शोभत नाही, असंही भोंडेकरांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : कंगना राणौत, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट, भाजपकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)