मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय थांबणार नाही : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Speech : मोदीजी तुम्ही 10 वर्ष सत्तेत होतात आणि आज तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आला आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली : मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. मोदीजी तुम्ही 10 वर्ष सत्तेत होतात आणि आज तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आला आहे. असा गद्दाराला गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असंह उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी डोबिंवली येथील सभेमध्ये हे वक्तव्य केलं आहे.
मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय...
उद्धव ठाकरे म्हणाले, या मशाली पेटलेल्या आहेत. मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे. गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय. असा गद्दाराला गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केलं आहे.
शिवसैनिकच एकमेंकामध्ये लढवायचा भाजपचा डाव
उद्धव ठाकरे यांनी ठाकरी तोफ डागत म्हटलं की, जो नाही कामाचा, तो नाही रामाचा. हे भाजपचे नीच डाव आहेत, शिवसैनिकच एकमेंकामध्ये लढवायचं. मी येताना पाहिलं काही जण आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते. आमची निशाणा चोरतोय, अरे चोर तो चोर वर शिरजोर. हे गद्दार जे आज आपल्य अंगावरती येतायत, जरा 4 तारखेपर्यंत थांबा, तुमचा गॅसचा फुगा झालाय, त्याला टाचणी कशी मारतो, ते बघा, असं म्हणत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे.
पैशाचा महापूर येईल, पण आयुष्य विकणार आहात का?
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, हे सगळं मी बोलतोय, हे तुमच्या जीवावर बोलतोय. तुम्ही साथ देणार ना, विजय मिळवून देणार ना, पैशाचा महापूर येईल, पण आयुष्य विकणार आहात का, भविष्य विकणार आहात का, खोक्यामध्ये बंद होणार आहात का, मग मला एकच वचन द्या. हातामध्ये जी मशाल आहे, त्या मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
गद्दाराला गाडा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
गद्दारांविरुद्ध मला निसटता विजय नकोय, गद्दाराला गाडा. पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivli Lok Sabha) गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महत्त्वाचा इतर बातम्या :