गद्दारांना असा गाडा की, गद्दारीचा किडा पुन्हा कल्याण-डोंबिवलीमध्ये वळवळता कामा नये : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Speech in Dombivli : गद्दाराला असा गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केलं आहे.

डोंबिवली : गद्दारांला असा गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivli Lok Sabha) गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी परखड टीका केली आहे. गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय, गद्दाराला गाडा, असं ठाकरेंनी म्हटलं आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची डोबिंवलीमध्ये सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये
उद्धव ठाकरे म्हणाले, वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे. गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय. असा गद्दाराला गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केलं आहे.
गुजरातला नेलेलं महाराष्ट्राचं वैभव परत आणणार
महाराष्ट्रात आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येणारच. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर महाराष्ट्राची लूट थांबवणार. महाराष्ट्राचं वैभव जे यांनी गुजरातला नेलं आहे, ते लूटलेलं वैभव महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठीही वचनं दिली आहेत. मोदीजी तुम्ही 10 वर्ष सत्तेत होतात आणि आज तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.
अमित शाह तुम्ही का उलटे झालात?
अनेकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की, मराठी भाषेला अभिजाचत दर्जा द्या, अजून का दिला नाही. आज अमित शाह कुठेतरी बोलले, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, जो गोहत्य करेल त्यांना आम्ही उलटे टांगू, मग आजपर्यंत 10 वर्ष त्यांना तिरकं टांगलं होतं का. बरं गोहत्या केल्यावर त्यांना उलटं टांगणार, पण मणिपूरमध्ये महिलांचे जे धिंडवडे काढले त्यांच्या सोबत अमित शाह तुम्ही का उलटे झालात. तुमचं का खाली डोकं वर पाय झालं. आम्हाला पहिलं मातेचं रक्षण करायचंय, गोमातेचं आम्ही नंतर करणार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
गद्दारांच्या गॅसच्या फुग्याला टाचणी कशी मारतो बघा
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, काही जण आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते. आमची निशाणा चोरतोय आणि चोर तो चोर वर शिरजोर. हे गद्दार जे आज आपल्य अंगावरती येत आहेत, जरा 4 तारखेपर्यंत थांबा, तुमचा गॅसचा फुगा झालाय, त्याला टाचणी कशी मारतो, ते बघा, असं म्हणत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे.
पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय थांबणार नाही : उद्धव ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
