एक्स्प्लोर

मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...

Uddhav Thackeray on Vishal Patil : मशाल चिन्हाने आमची अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी सुरुवात  झाली होती. मशालीने हुकूमशाही राजवट भस्म होईल हा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पक्षाचे नवं गीत लाँच केलं. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अन्य नेतेही उपस्थित होते. "शिवसेनेचं नवं गीत आम्ही सादर केलं आहे. मशाल चिन्हाने आमची अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी सुरुवात  झाली होती. मशालीने हुकूमशाही राजवट भस्म होईल हा विश्वास आहे" असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

ठाकरे गटाचा वचननामा जवळपास निश्चित

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) आमचा वचननामा जवळपास निश्चित झालाय. मशाल चिन्हावर आमचा पहिला विजय झाला आहे. देशातील हुकूमशाही हटवा असं आवाहन करतोय, आवाहन म्हणजे विनंती आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राम मंदिर निर्माणामध्ये अगदी बाबरीपासून मोदींनी कधी सहभाग घेतलाय ते सांगा, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमचा वचननामा जाहीर करताना पेपर फोडणार नाही. लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध होईल. काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केलेला आहे. आता राज्यातील मुद्दे घेऊन संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करू. 

संयुक्त सभासुद्धा आम्ही लवकरच घेऊ. निवडणूक आहे माहिती आहे. त्यामुळे गरज असेल तर वेगळा, एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करू.

इलक्ट्रोल बॉण्ड प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला आहे. जगताला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. याला मोदी गेट असं नाव दिलंय. आता विरोधकांना पच्छाताप होईल कारण हे प्रकरण आधी समोर का आलं नाही?

सांगलीत बंडखोरी होत असेल तर....

विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर त्याचा फटका बसणार नाही. जर बंडखोरी होत असेल तर, त्या पक्षाने त्या नेत्यांना समजून सांगितलं पाहिजे. जागावाटप झालेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देश वाचविण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन करतोय. आव्हान हुकूमशाहीला आणि आवाहन जनतेला असेल, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.  

माझं टार्गेट 48 असेल, आम्ही 48 जागा जिंकू. विनोद घोसाळकर माझ्यासोबत आहेत ते कुठेही जाणार नाहीत. तीन टक्के ज्यांच्यावर, ईडी कारवाई झाली त्यातील किती लोकांना भाजपने घेतले आहे. 

भाजप हा व्हॅक्युम क्लीनर झाला आहे. मोदी व्हॅक्युम क्लीनर इकडे-तिकडे फिरत आहे. प्राण जाये वचन ना जाये असं त्यांना कळलं असतं, तर अडीच अडीच वर्षे सरकार मान्य झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget