एक्स्प्लोर

विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटानं कंबर कसली; मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा

मुंबई पदवीधर आणि शिक्षक त्यासोबतच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाच्या चार जागांच्या निवडणुका 10 जूनला होणार आहेत. तर 22 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे.

Vidhanparishad Election : मुंबई : शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या (Thackeray Group) सेनेकडून नावांची चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे  उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब (Anil Parab), वरून सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघात ज. मो. अभ्यंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. 

मुंबई पदवीधर आणि शिक्षक त्यासोबतच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाच्या चार जागांच्या निवडणुका 10 जूनला होणार आहेत. तर 22 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. 

अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात? 

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून उतरवलं जाऊ शकतं. 

वरुण सरदेसाईंनाही संधी मिळणार? 

अनिल परब यांचा 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांचं नाव उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे. त्यासोबतच ठाकरे गटाचे युवा नेते सचिव वरून सरदेसाई  यांचासुद्धा विचार मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केला जात आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचं नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानला जात आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सह संपर्कप्रमुख  आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नाशिक शिक्षक मतदार संघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी  शिवसेना ठाकरे गटात सोबत असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

कोणत्या  चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार?

  • विलास विनायक पोतनीस - मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
  • निरंजन वसंत डावखरे - कोकण पदवीधर (भाजप)
  • किशोर भिकाजी दराडे - नाशिक शिक्षक  (ठाकरे गट)
  • कपिल हरिश्चंद्र पाटील - मुंबई शिक्षक (लोकभारती)

मतदान आणि मतमोजणी कधी? 

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे.  विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि  दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून 13 जूनला मतमोजणी होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget