लस ते लसूण... उद्धव ठाकरेंची मोदीसह भाजपवर जहरी टीका; A to Z मुद्दे, काय म्हणाले? वाचा सविस्तर
Uddhav Thackeray in Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : 2019 साली आपण फसलो होतो. एक अकेला सबसे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रत्नागिरी : कोकण (Kokan) हे आमच्या ठाकरे कुटुंबीयांचा हृदय. कोकणात प्रचार करण्याची गरज आहे का? शिवसेना (Shiv Sena) फोडण्याचा प्रयत्न झाला तरी, तुम्ही जागच्या जागी उभे याचा अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. धनुष्यबाण चोरला आणि आता तर कोकणातून गायब देखील करून टाकला. दिल्लीत बसलेले दोघे शिवसेनेचे कोकणातील नाते तोडायला निघाले आहेत. 2019 साली आपण फसलो होतो. एक अकेला सबसे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
लस ते लसूण... उद्धव ठाकरेंची मोदी फडणवीसांवर जहरी टीका
एक समाधान आहे, कोरोनाकाळात पहिल्या क्रमांकाचा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. पण, अत्यंत नम्रपणाने सांगतो, हे कर्तृत्व माझं नव्हतं, तुमची साथ आणि सोबत नसती, तर महाराष्ट्र वाचू शकला नसता. फडणवीस सांगतायत, बाकी विकासकामं सोडून द्या पण, मोदींजींनी लस दिली नसती, तर आपण वाचू शकलो नसतो. अरे लस म्हणजे काय लसूण आहे, जो मागच्या बागेमध्ये पिकवला आणि दिला. तो लसूणही 400 पार गेला होता यांनी नारा दिल्यावर खाली आला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप, मोदी आणि फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
लघु किंवा सूक्ष्म प्रकल्प कोकणात आणलात का?
मोदी आणि शाह यांना काही वाटत नसेल, पण अटलजींचा आत्मा रडत असेल. अबकी बार भाजप तडीपार. समोर जो आहे, त्याला टोप घालताना विचार करावा लागतो, आज आपण कोणत्या पक्षात आहोत. तुमच्या साईजप्रमाणे म्हणजे लघु किंवा सूक्ष्म असे प्रकल्प कोकणात आणलात का? निवडणुकीनंतर हे दिसणार नाहीत, मायक्रोस्कोपने बघावं लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेना नसती, तर कोकणात गुंडाराज असता
तुम्हाला घराणेशाही चालत नाही पण शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावता. कोकणातले सर्व नेते तुमच्यासोबत उभे राहिले नसते, तर गुंडाराज उभे राहिले असते. तुम्हाला गुंडाराज हवे आहे का? शिवसेना मधे पडली नसती तर बारसूचा विषय संपला असता. बारसू आणि जैतापूर सारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणू देणार नाही. तुम्ही दोघे उपरे आमच्या रक्तातील जय भवानीचा प्रेम काढून पाहता, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
ईडी, सीबीआय उद्या आमच्याकडे
ईडी, सीबीआय उद्या आमच्याकडे असणार आहेत. उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. 400 पार आपली घटना बदलण्यासाठी आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलायला निघाला, असा सवाल ठाकरेंनी केलाय.
...तर मी आता प्रचार थांबवतो
15 लाख रुपये कुणाच्या खात्यात आले आहेत का? ते आल्यास मला सांगा मी प्रचार थांबवतो. काँग्रेसला 60 वर्षात जमले नाही ते तुम्ही अडीच वर्षात कमावले, असं म्हणत इलेक्ट्रॉल बाँड्सवरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते जय श्री राम बोलत नाही, तर आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम-राम घ्यावा, असं म्हणत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.
तुमच्या आणि माझ्या आयुष्यमधील 10 वर्ष फुकट गेली
ही गद्दारची टोळी नाहीतर दहशतवाद्यांची टोळी. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर जीएसटीमध्ये बदल करणार, जे होण्यासारखे असेल तेच मी बोलतो आणि करून दाखवतो. उद्धव ठाकरे यांचे वचन की मोदींची गॅरंटी हे तुम्ही ठरवा. तुमच्या आणि माझ्या आयुष्यमधील 10 वर्ष फुकट गेली, मी चूक केली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोकणवासियांची माफी मागितली आहे.
पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :