(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई पालिकेची 90 हजार कोटींची FD तोडली, 3 लाख कोटी उधळून टाकले, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
या सरकारनं मुंबई महापालिकेची 90 हजार कोटींची एफडी तोडली आहे. या सरकारनं राज्याची, महापालिकेची तिजोरी खाली केल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं.
Uddhav Thackeray : या सरकारनं मुंबई महापालिकेची 90 हजार कोटींची एफडी तोडली आहे. या सरकारनं राज्याची, महापालिकेची तिजोरी खाली केल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. मुंबई आयुक्तांना माझं आवाहन आहे की, तुम्ही तीन लाख कोटी कोणाला दिले याची आम्हाला यादी हवी आहे. तीन लाख कोटी कुठं उधळून टाकले? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. शिवाजी पार्कवर आयोजीत करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
सध्या कर्ज काढून फटाके फोडले जातायेत
सध्या कर्ज काढून फटाके फोडले जात आहे. मुंबई डोळ्यादेखल विकली जात असताना मी गप्प बसणार नाही. जे दिसतंय ते पाहवत नाही म्हणून मी लढतोय. कोणी असो नसो माझ्यासोबत मी लढणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर धारावीमध्ये पोलीसांना, गिरणी कामगारांना, जी मराठी माणसे तुम्ही मुंबईतून हद्दपार करत आहेत . त्या सर्व मराठी माणसांना धारावीत आणेल आणि त्यांना जागा देईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीच्या माध्यमातून आख्खी मुंबई लुटतायेत
जे महाराष्ट्र लुटतायेत त्यांचे आम्ही शत्रू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. धारावीच्या माध्यमातून आख्खी मुंबई लुटत असल्याचे ठाकरे म्हणाले. बंदर अदानीला विमानतळ अदानीला, चंद्रपूरची शाळा, खानी अदानीला, धारावी झोपटपट्टी, वाद्रेंची जागा अदानीला दिली. मिठागरं सगळ्या जागा त्यांना दिल्या असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.