उद्धव ठाकरे बिनडोक, आदित्य ठाकरे बिघडलेल्या मानसिकतेचे बालिश कार्टे, भाजप नेत्याचा हल्लाबोल
Uddhav Thackeray and Aditya Thackeray, नागपूर : उद्धव ठाकरे बिनडोक, आदित्य ठाकरे बिघडलेल्या मानसिकतेचे बालिश कार्टे, भाजप नेत्याचा हल्लाबोल
Uddhav Thackeray and Aditya Thackeray, नागपूर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गुरुवारी (दि.23) अंधेरीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळ्याव्यातून उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "मराठी माणसाच्या नादाला लागू नका. औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे बिनडोक तर आदित्य ठाकरे बिघडलेल्या मानसिकतेचे बालिश कार्टे असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
View this post on Instagram
चंद्रशेखर बावनकुळे काय काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहे. जनमाणसात प्रतिमा मलीन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीत. 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही. खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून त्यांचे खासदार आणि आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले. त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात. आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत. जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर. ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती. राहिला प्रश्न 2019 चा तर गद्दारी केलीच ना? गद्दारी झालीच त्यांच्याकडून. त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची. त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राच वेगळं चित्र असतं.
View this post on Instagram
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्या जवळ अजून त्या ठिकाणी जनमत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत रोज कमी होईल या पद्धतीचे वागणं उद्धव ठाकरेंच आहे. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला विकासाकडे नेण्याऱ्यांचं राज्य हवं आहे. माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी. डबल इंजन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे. उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतन बाहेर निघावं, बिनडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल.
आपले आदित्य ठाकरे बालीश आहेत, त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाहीय, ते दोन वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले. त्यांना अजून सरकार मधला मूळ गाबा कळला नाही. त्यांनी देवेंद्रजींचे अभिनंदन करायला पाहिजे होतं की. 17 लक्ष 17.75 लाख कोटी रुपये 17.75 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे. देशभर कौतुक होत आहे, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कारटे आहेत काही सुधरत नाहीये. पाच लाख कोटी विदर्भात इन्वेस्ट होत आहेत. गडचिरोलीमध्ये तीन लाख कोटी इन्वेस्टमेंट विदर्भ बदलता आहे. बदलणारच आहे. महाराष्ट्र थांबणार नाही, हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे, विकसित महाराष्ट्र होणार आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या