Bhandara Factory Explosion : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या स्फोटातील मृतांचा आकडा 8 वर, प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन
Bhandara Factory Explosion : भंडाऱ्यातील फॅक्टरी स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला असून पाच कामगार गंभीर जखमी झालेत.
Bhandara Factory Explosion : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज (दि.24) दुपारी मोठा स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा आता 8 वर पोहोचला आहे. भंडारा जवाहरनगर आयुध निर्माणीत सकाळी झालेल्या ब्लास्टमध्ये 13 कामगारांना बाहेर काढण्यात आले. यात आठ कामगारांचा मृत्यू झाला असून पाच कामगार गंभीर जखमी झालेत. शेवटचा मृतदेह रात्री 8.15 वाजताच्या सुमारास काढण्यात आला असून आता शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. फॅक्टरीमध्ये मृत्यू झालेल्या पैकी आठवा मृतदेह (संजय कारेमोरे - वय 32) भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.. 6 शवविच्छेदन झाले असून उर्वरित 2 शवविच्छेदन उद्या होणार आहेत...
दरम्यान, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात 20 वर्षीय अप्रेंटिस धारक अंकित बारई हिचा मृत्यू झाला होता...त्यानंतर अंकित बारईचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शिवाय मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह घरी नेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बारई यांच्या कुटुंबियांनी घेतलाय. 1) बारई कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी.. 2) कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्यात यावे... ३) ऑर्डनन्स फॅक्टरीला लागून असलेला सावली गावचे पुनर्वसन करण्यात यावं, अशी मागणी लावून धरली आहे..
अप्रेंटिस धारकाच्या मृत्यूस फॅक्टरी प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा , या मागणीसाठी अप्रेंटिस धारकांनी जवाहरनगर ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. यांच्यापैकी दहा अप्रेंटिस धारकांना पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरिता पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या दुर्घटनेनंतर संतप्त अप्रेंटिस धारकांचा जवाहरनगर पोलीस ठाण्यात आक्रोश पाहायला मिळतोय. या ब्लास्ट दुर्घटनेत एका अप्रेंटिस धारकांचा मृत्यू झाला असून एक अप्रेंटिसधारक गंभीर असल्याने अप्रेंटिसधारकांमध्ये उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेत या अप्रेंटिसधारकांनी जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या गेटवर तीन तास ही आंदोलन केलं होतं. आता या संतप्त अप्रेंटिस धारकांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोहोचून ठाण्याला घेराव घातला आहे
आयुध निर्माणी येथे झालेल्या मृतांचा व जखमींचा यांचा तपशील
मृत
चंद्रशेखर गोस्वामी 59 वर्षे
मनोज मेश्राम 55 वर्षे
अजय नागदेवे 51 वर्षे
अंकित बारई 20 वर्षे
लक्ष्मण केलवडे वय अंदाजे 38
अभिषेक चौरसिया वय 35
धर्मा रंगारी वय 35 वर्ष
संजय कारेमोरे 32
जखमींची नावे
एन पी वंजारी 55 वर्षे
संजय राऊत 51 वर्ष
राजेश बडवाईक 33 वर्षे
सुनील कुमार यादव 24 वर्षे
जयदीप बॅनर्जी 42 वर्षे
इतर महत्त्वाच्या बातम्या