एक्स्प्लोर

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला

गिरणी कामगार हे काल प्रचंड मोठ्या प्रमाणात राणीच्या बागेपासून जमा होणार होते. मात्र, शासनाने परवानगी नाकारल्यामुळे सर्वजण आझाद मैदानात जमा झाले.

मुंबई : गिरणी कामगारांच्या मुंबईतील (Mumbai) घरासंदर्भात कामगारांच्या विविध संघटनांची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून शेलू, वांगणी येथे घर न देता मुंबईतच घर देण्यासंदर्भाने विचार करण्यात आला आहे. तसेच, शेलू, वांगणी येथील घर नाकारणाऱ्यांना घर देणार नाही, अशी शासनाच्या जीआरमधील अट देखील रद्द करण्यात आली. याबाबत, आमदार सचिन अहिर (Sachin ahir) यांनी माहिती दिली. तसेच, मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनीही बैठकीचा वृत्तांत सांगितला, यावेळी नाव न घेता त्यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.  

गिरणी कामगार हे काल प्रचंड मोठ्या प्रमाणात राणीच्या बागेपासून जमा होणार होते. मात्र, शासनाने परवानगी नाकारल्यामुळे सर्वजण आझाद मैदानात जमा झाले. गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात आला होता. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, भाई जगताप आझाद मैदानात आले होते. सरकारला एमएमआरच्या नावाखाली आम्हाला मुंबईबाहेर पाठवायचे होते. ज्यांना घरे घ्यायची आहेत, त्यांनाच बाहेर पाठवायचे आहे. मात्र, आज आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन आमची मागणी मांडली. घर घेतले नाही तर घर जाणार असा शासनाचा जीआर होता, तो बदलून टाकला. तसेच, ज्यांना फॉर्म भरता आला नाही त्यांच्याबाबतही चर्चा झाली. उपमुख्यंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली, इतर मंत्री आणि संघटनेचे लोक होते, अशी माहिती आमदार व गिरणी कामगार संघटनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली. 

मुंबईतच घर देण्याबाबतच प्रस्ताव

सरकारने याबाबत शेलू आणि वांगणीत घर नको असेल तर घर नाही अशी जीआरमधील जाचक अटी कमी कण्याचे आश्वासन दिले आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घर कुठे देणार हा प्रश्न होता, रमाबाई आंबेडकर आणि धारावीसारख्या जागी घर देऊ शकता येते का, तसेच इतर काही मार्ग त्यांना सांगितले आहेत. खारफुटीच्या जमिनीवर घरे बांधता येतील, त्याव्यतिरिक्त एमएमआर रिजनची हद्द पनवेलपर्यंत होती, आता अलिबागला गेली आहे. पण, तसे चालणार नाही, मुंबईतच घर देणार, मुंबई लागत घर देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही अहिर यांनी म्हटले. 

खासगी विकास करणारे असतील तर त्यांना 50 टक्के घरे कामगारांना आणि 50 टक्के एफएसआय देण्यात येईल का? याबाबत विचार आहे. सरकारला आम्ही मार्गदर्शन करू, वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका घेऊ. निश्चितपणे सकारात्मक आहे आणि आशावादी आहोत, पण यावर न राहता अपेक्षित निर्णय झाला पाहिजे, अशी मागणीही सचिन अहिर यांनी केली. तसेच, शासनाचा जी.आर. रद्द केल्यामुळे पुढच्या काळात सक्ती केली तर जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शेलू आणि वांगणीत 15 लाखाला घरे देण्यात येत आहेत, तर खासगी ठिकाणी येथे 10 लाखाला घर मिळत आहेत, मग ही सक्ती का? जो अन्यायकारक जी आर होता, तो रद्द करण्यात आम्ही यशस्वी झालो. गिरणी कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे, असे सचिन अहिर यांनी सभागृहात म्हटले. 

उदय सामतांचा उद्धव ठाकरेंना टोला

सचिन अहिर यांच्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली. यावेळी, नाव न घेता उद्धव ठाकरे आणि विरोधकांना त्यांनी लक्ष्य केलं. काल गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात निघाला, त्यात काहींनी राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केला. आज ठरल्याप्रमाणे गिरणी कामगारांची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतं बैठक झाली. कामगारांच्या तीन चार मागण्या होत्या, त्यापैकी सेलूमध्ये घर नाकारलं तर कुठेही घर देणार नाही असा शेरा शासन निर्णयात होता तो रद्द केला आहे. मुंबई आणि मुंबईलागतं घर हवी ही मागणी होती. एसआरएच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून जवळपास घर बांधून देता येतील का यावर चर्चा झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घरं देऊन दाखवू, असेही सामंत यांनी ठामपणे सांगितले. तसेच, वेगवेगळ्या जागा देऊन घर बांधून देणार आहोत, काही लोकं नुसतं भाषण करतात, गप्पा मारतात. मात्र, एका बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व पण, तू, परंतु लांब केल्या आहेत, असे म्हणत सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हेही वाचा

''हा कायदा डाव्या विचारांच्या विरुद्ध नाही, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये यासाठी''; जनसुरक्षा विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report
Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget