Tripura BJP Candidate List 2023: त्रिपुरा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, 'या' दोन उमेदवारांची देशभरात चर्चा
Tripura Election 2023: त्रिपुरा विधानसभा निवडणूक 2023 साठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 48 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Tripura Election 2023: त्रिपुरा विधानसभा निवडणूक 2023 साठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 48 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही यादी जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब निवडणूक न लढवण्याच्या अटकेला पुष्टी मिळाली आहे. या यादीत बिप्लब कुमार देब यांचे नाव नाही. तसेच बनमालीपूर या त्यांच्या जागेवरून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या जागेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य निवडणूक लढवत आहेत. यातच मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांना बोरदोवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना धानपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Tripura Election 2023: दोन मुस्लिम उमेदवारांना तिकीट
भाजपवर सतत मुस्लिम उमेदवारांना तिकीट न देण्याचा आरोप होत आला आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी भाजपला लक्ष देखील केलं आहे. मात्र आगामी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत दोन मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. तफजल हुसेन यांना बॉक्सनगरमधून तिकीट देण्यात आले आहे. तसेच कैलाशहरमधून मोहम्मद मोबेशर अली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन उमेदवारांना तिकीट दिल्याने याची देशभरात चर्चा होत आहे.
Tripura Election 2023: 16 फेब्रुवारी रोजी होणार मतदान
निवडणूक आयोगाने 18 जानेवारी रोजी त्रिपुरातील 60 जागांच्या विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ 22 मार्च रोजी संपत आहे. त्रिपुरा निवडणुकीसाठी 21 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामांकनाची अंतिम तारीख 30 जानेवारी आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
The first list of 48 BJP candidates for the General election to the legislative assembly of Tripura finalised by the BJP Central Election Committee. pic.twitter.com/XmZ7g5y1pp
— BJP (@BJP4India) January 28, 2023
दरम्यान, त्रिपुरामध्ये सलग दोनवेळा भाजपची सत्ता आली आहे. गेल्या वेळी भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले होते, परंतु त्यांच्या आणि सीपीएममधील मतांच्या टक्केवारीत फक्त 1.25 टक्के फरक होता. भाजपने 2022 मध्ये बिप्लब देब यांना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा माणिक साहा यांच्याकडे सोपवली होती. यंदाही भाजपसमोर सीपीएमचे मोठे आव्हान आहे.
इतर महत्वाची बातमी: