(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis on Uniform Civil Code : राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Uniform Civil Code : राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis on Uniform Civil Code : राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकलं नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे, गुजरात देखील करणार असल्याचे ते म्हणाले. मला वाटतं हळूहळू सगळ्याच राज्यात हा कायदा लागू होणार आहे. महाराष्ट्रही योग्य वेळी याचा विचार करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात समान नागरी कायद्याबाबत मी अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण याबाबत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असल्याचे फडणवीस म्हणाले. यावर बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. याचा सर्व राज्यांनी विचार करावा. त्याची अंमलबजावणी करणारी राज्ये अभिनंदनास पात्र आहेत. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीचा उत्साह कायम आहे. गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही गुजरात जिंकतोय, येथे केलेल्या कामगिरीच्या आधारे आम्ही विभाज्य मिळवू. पंतप्रधानांचा देशभर दौरा पाहा. ते खूप मेहनत करतात. त्याचा परिणाम म्हणजे देशाची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. राहुल गांधींनी देखील यात्रा सुरू केली आहे, पाहूया काय होतंय ते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, ''हे अत्यंत चुकीचे आहे, राजकारणात मर्यादा असली पाहिजे. खरगे साहेब काँग्रेस अध्यक्ष आहेत, त्यांना ते शोभत नाही. पंतप्रधान ही व्यक्ती नसून संस्था आहे. अशी विधाने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शोभत नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्ष हताश आणि हतबल झाल्याचे दिसत आहे. यापूर्वीही काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ही त्यांची सवय आहे आणि हा विचारपूर्वक केलेला हल्ला आहे.'' मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना रावणाशी केली होती.
इतर महत्वाची बातमी: