सुरेश धस मध्यरात्री अचानक अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंशी गुप्त चर्चा अन् सकाळी मोठा निर्णय
मध्यरात्रीची धस जरांगे यांची चर्चा झाल्यानंतर सकाळी मनोज जरांगेंनी सकाळी घेतलेला मोठा निर्णय.. त्यामुळे आंतरवली सराटीत नक्की चाललंय काय अशी चर्चा सुरु आहे.

Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उडी घेत मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना मध्यरात्री (30 जानेवारी) भाजप आमदार सुरेश धस भेटून गेल्याची माहिती आहे . दोन दिवसांपूर्वीच रात्री उशिरा अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेत चर्चा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी चर्चा केली होती . रात्री पाऊण ते पावणे दोन वाजेपर्यंत तासभर मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सलाईन लावावे यासाठी ते गेल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मध्यरात्रीची धस जरांगे यांची चर्चा झाल्यानंतर सकाळी मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचे उपोषणच थांबवले. त्यामुळे आंतरवली सराटीत नक्की चाललंय काय अशी चर्चा सुरु आहे. (Jalna)
दोन दिवसापूर्वी सुरेश धस रात्री उशिरा मनोज जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांनी मनोज जरांगे यांना सलाईन लावण्याचा आग्रह देखील केला होता, त्याच रात्री मनोज जरांगे यांनी सलाईन देखील लावले आणि काल रात्री सुरेश धस अचानक अंतरवाली मध्ये दाखल झाले.. दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील मात्र कळू शकलेला नाही.
मराठा आरक्षणाचे उपोषण जरांगेंनी थांबवले
दरम्यान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे .मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे समोर आला आहे .मराठा समाजाचे डोळे उघडले असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली .इथून पुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणाच त्यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे . दरम्यान दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यात आले आहेत .बीड प्रकरणात पुराव्यांचा पेन ड्राईव्ह आणि पुरावे अजित पवारांकडे देणार असल्याचे सुरेश धस म्हणाले .
तथ्य असेल तर कारवाई होणारच: अजित पवार
बीड जिल्ह्यात कोणी कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल, पण जिथे तथ्य नसेल त्या वेळी कारवाई केली जाणार नाही, अशा रोखठोक शब्दांत गुरुवारी बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका मांडली. यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रीया दिली असून तज्ञ असल्याशिवाय मी बोलत नाही. तज्ञ असेल तरच कारवाई करण्यासाठी आम्ही दादांना सांगणार आहोत असं सुरेश धस म्हणाले.
हेही वाचा:























