एक्स्प्लोर

धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 

Suresh Dhas On Dhananjay Munde : माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होतास तू काय झालास तू, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केलीय. 

Suresh Dhas on Massajog Crime: माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. त्यामुळे मी या प्रकारात जास्त सहभागी आहे. धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का? आणि गोपीनाथ गडावरून हे बोलता? तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ? तुम्हाला सिरियसनेस काय आहे, हे गँग ऑफ वासेपूर आहे असल्याची टीका करत भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावर भाष्य केलंय. 

माधव जाधव प्रकरणात त्याची काय चूक होती. कोठे गुन्हे दखल केले जात आहे? डॉक्टर वर गुन्हा दाखल केला हे खरं आहे का? आता पर्यंत किती प्रकरण झाले? बबन गित्ते खरचं आरोपी होता का? परळीत सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते, या प्रकरणात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री लक्ष देणार नाही. धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होतास तू काय झालास तू, असे ही आमदार सुरेश धस म्हणाले. 

आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर (PCR) मिळाला ही समाधानाची बाब

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अमानवी खुनाच्या प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. काल रात्री मी एसआयटी (SIT) संदर्भात विचारणा केली आणि मुख्यमंत्री यांनी कालच पत्रावर सही केली. त्यामुळे लवकरच एसआयटी स्थापन होईल. संतोष देशमुख हत्या अमानवी घटना घडली आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो. आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर (PCR) मिळाला ही समाधानाची बाब आहे.  सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी गती मिळेल. आयजी लेवलचे अधिकारी, ज्युडिशिअल तपासणी होणार यासाठी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले आहे.  

दरम्यान आता बीड जिल्हा एकवटनार आहे. गृहमंत्र्यांनी सकारात्मक निवेदन केले आहे. जे उद्योग अधिकाऱ्यांनी केले आणि त्यांच्यावर कारवाई झाली, यावरून कायदा नावाची गोष्ट राहिली की नाही हा प्रश्न आहे. ॲक्शन आता सुरू झाली आहे. जे अधिकारी दिले त्यांचं काम समाधानकारक आहे. पोलीस, सीआयडीहे सर्व याचा तपास करत आहे. पोलीस उर्वरित आरोपींना अटक करतील. मात्र या प्रकरणात अविश्वास दाखवून चालणार नसल्याचे म्हणत भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.   

मुख्यमंत्र्यांनी, अजितदादांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे

छोटा आका आत गेला असून कराड 302 चे प्रमुख सूत्रधार आहेत. अराजकता परळीत जाऊन पहा, काय अवस्था आहे. यांना लवकर अटक करावी. एसआयटी स्थापन होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावे किंवा अजितदादांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे. मागचे पालकमंत्री होते त्यांनी पालकमंत्री पद आणि मंत्रीपद भाड्याने दिले होतं. मी पण 28 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. मी घाबरत कोणालाच नाही. अका 302 मध्ये सुध्दा आहे. परळीतील डूबे प्रकरणात आरोपी कोणता दाखलवा? किती पैसे देवून प्रकरण मिटले हे समोर येईल. ते परळीतील लोक सुद्धा मला भेटणार आहेत.  मी 1999 पासून आमदार आहे. त्यामुळे हे वागणं कुठलं आहे? काही रेकॉर्डिंग व्हायरल करा, पिस्तुलच्या लायसनला परवानगी कुणाची? हे लायसन रद्द करा. अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget