Supriya Sule : 'आता याची हेडलाईन करू नका, नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील'; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने पिकला एकच हशा!
Supriya Sule : बाहेर जरी ते शरद पवार असले तरी घरात ते नवराच आहेत. असा मिश्किल शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलं आहे .
मुंबई : शिक्षणाच्या बाबतीत अनेक बदल होतात आणि त्यावरती चर्चा देखील होत असतात. शिक्षणाबद्दल प्रकाशजी जावडेकर आणि माझे याबाबतीत चांगले विचार आहेत. तसेच आमचे मतभेद देखील आहेत. परंतु याबाबतीत मात्र आम्ही एकत्रित आहेत. मराठी भाषा याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. पुढच्या पिढीला मराठी भाषा चांगली आली पाहिजे. आर. आर पाटील सोडले तर राजकारणात कोणत्याही नेत्याची मुलं सरकारी शाळेत गेलेले नाही, ते वास्तव आहे. अगदी मीही गेलीली नाही. पवार कुटुंबात कॉन्व्हेंट मध्ये जाणार पहिलं मूल म्हणजे मी आहे.
माझ्या वडिलांचं फार म्हणणं होतं की मी मराठी शाळेत शिकावं, परंतु आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकली. घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं, तो भाग वेगळा. बाहेर जरी ते शरद पवार असले तरी घरात ते नवराच आहेत. आता याची हेडलाईन करू नका, नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील. असा मिश्किल शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भाष्य केलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित 15वी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
....तर मेंदूच आकलन कसं होईल?
यशस्वी झाल्यावर नापास झालेल्या मुलांची कथा फार चांगली वाटते. कुठलंही मूल धन असतं ह्या मताची मी आहे. मला दोन मुलं आहेत, ते वाढवताना एवढा त्रास होतो. परंतु शिक्षक चाळीस मुलांना सांभाळतात. त्या मुलांची आयक्यू लेवल वेगवेगळे असते त्यांना ते सांभाळतात हे विशेष आहे. तंत्रज्ञान येतं त्यात शिकावं या मताची मी आहे, मला पण ते आवडतं. परंतु पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटते. चॅट जीपीटीची भीती वाटतेय. जीपीटीच्या माध्यमातून पोर गृहपाठ करायला लागली तर मेंदूच आकलन कसं होईल? हा खूप गंभीर विषय असल्याची भीती खासदार सुप्रिया सुळेंनी बोलताना व्यक्त केली आहे.
माझं गणित अगोदरही कच्चं होतं आताही आहे, कारण....
तंत्रज्ञानामुळे केवळ शिक्षकांची नोकरी जाणार नाही, कारण शिक्षक ही नोकरी नाहीये तर ती सेवा आहे. आई-वडिलांनंतर माझ्यावर संस्कार हे शिक्षकांनी केले. माझं गणित अगोदरही कच्चं होतं आताही कच्च आहे. कारण मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही. कारण मला जास्त काही मोजावे लागत नाही. इन्फ्रा स्ट्रक्चरला एवढे पैसे दिले जातात, मग शिक्षणाकडे का लक्ष दिले जात नाही? इन्फ्रास्ट्रक्चर व्हाव या मताची मी आहे. परंतु मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, त्याकडे प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणासाठी निधी दिला नाही तर एक पिढी शिकू शकत नाही. शिक्षणात राजकारण येऊ नये, या मताची मी असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या