Pune Accident Case : मोठी बातमी : डॉ. तावरेंच्या अटकेनंतर गायब असलेले सुनील टिंगरे अखेर समोर आले, शिफारस पत्राबाबत म्हणाले...
Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालांच्या लाडोबाचे ब्लड रिपोर्ट बदलून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर अजय तावरेंना (Ajay Taware) आज (दि.27) पोलिसांकडून अटक करण्यात आली.
Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालांच्या लाडोबाचे ब्लड रिपोर्ट बदलून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर अजय तावरेंना (Ajay Taware) आज (दि.27) पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान, अजय तावरेंची नियुक्ती ससून रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे शिफारस पत्र आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. त्यानंतर तावरेंच्या नियुक्तीसाठी सुनील टिंगरेंनी प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले गेले. दरम्यान सुनील टिंगरे अजय तावरेंच्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले सुनील टिंगरे ?
सुनील टिंगरे म्हणाले, आज माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. वास्तविक मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात. यामध्ये शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार, विनंती बदली आणि इतर अनेक कारणांसाठी शिफारस पत्रे नागरिकांकडून मागितली जातात. तसंच प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल!
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनेही अजय तावरेंना दणका
दरम्यान, पोलिसांकडून अटक झाल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनेही अजय तावरेंना दणका दिलाय. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून अजय तावरेंना नोटीस बजावण्यात आली आहे. अजय तावरे यांची कृती डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी आहे. अजय तावरे वैद्यकीय व्यवसायाच्या तत्त्वांच्या विरोधात काम करत आहेत, असं कौन्सिलच्या प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजय तावरेंविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजय तावरेंचे नाव कसे समोर आले?
औंधमध्ये करण्यात आलेल्या रक्त तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आले होते. मात्र ,पहिले रक्ताचे नमुने दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आलं.पोलिसांनी पहिल्या रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळणोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितले, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या