एक्स्प्लोर

Sunil Tatkare: अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर सुनील तटकरे संतापले; म्हणाले, जरा जपून..., वरिष्ठांनी भूमिका मांडल्यावर बोलण्याची गरज नाही!

Sunil Tatkare on Amol Mitkari : अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या वक्तव्यावरती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे: राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit pawar) आणि शरद पवारांची (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. याबाबत दोन्ही पक्षांकडून स्पष्टपणे उत्तर देखील देण्यात आलं होतं, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या. पांडुरंगाची ईच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोट मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले होते. मात्र, मिटकरींच्या या वक्तव्याने पक्षातील बड्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संतापल्याचं पहायला मिळालं. 

मिटकरींच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना, सुनील तटकरे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काल यासंदर्भात स्पष्टपणाची भूमिका मांडली आहे. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा सामुदायिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांना घेऊन आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतला. यावेळी सुनील तटकरे यांनी वरिष्ठ नेत्यांची नावे घेऊन वेगळी राष्ट्रवादी तयार करण्याची भूमिका देखील सांगितली. राज्यातल्या जनतेने आता आमचा राष्ट्रवादीवर शिक्कामोर्तब केला आहे. राज्यात आम्ही आता एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी आहोत. वेगळी राष्ट्रवादी करण्याचा निर्णय आता अधोरेखित आहे, त्यामुळे त्याच्यात जराही बदल होणार नाही. आम्ही घेतलेल्या भूमिकेत ज्यांना यायचे त्यांनी यावं. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही सुनील तटकरे यावेळी म्हणाले आहेत. तर अमोल मिटकरी यांनी आता बोलताना जपून वक्तव्य करावं, असं म्हणत सुनील तटकरे अमोल मिटकरींवर संतापले. तर पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही असंही त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितलं आहे. 

सुनील तटकरेंनी आधीच स्पष्ट केलेली भूमिका

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीच्या या दोन्ही बाजुंचा वर्धापनदिन 10 तारखेला पुण्यातच आयोजित करण्यात आला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रिडा संकुलात होणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी खासदार सुनील तटकरे दोन्ही बाजुच्या एकत्रीकरणाबाबत देखील भाष्य केलं होतं, गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना  सुनील तटकरे म्हणाले, पुण्यात वर्धापन दिन आयोजित करायचं आमचं आधीच ठरलं होतं. आमच्या मागे शरद पवारांचा पक्ष आला असं मी म्हणणार नाही. पवार साहेब जेष्ठ नेते आहेत‌. दोन्ही बाजु एकत्र येण्याचा कोणता प्रस्ताव नाही, त्यामुळे त्याबद्दल कोणती चर्चाही नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबरच राहणार आहोत. आमच्यासोबत यायचं असेल तर भाजपसोबत आघाडी करावी लागेल अशी अट घालणारे आम्ही कोण आहोत. 2014, 2016 मध्ये अनेकदा भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाल्या. पण निर्णय झाला नाही. अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही सामुहिक निर्णय घेतला. शरद पवार अध्यक्ष असलेल्या पक्षातील निर्णय प्रक्रिया आणि अजित पवार अध्यक्ष असलेल्या पक्षातील निर्णय प्रक्रिया यात काय फरक आहे याबद्दल मी बोलणार नाही. अजित पवार आणि शरद पवार कामाच्या निमित्ताने एकत्र येतायत, त्याचा वेगळा अर्थ काढू नये. त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यास माझा विरोध आहे ही अफवा आहे, अशी भूमिका सुनील तटकरेंनी याआधीच व्यक्त केली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी

व्हिडीओ

Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Pune Elections Results 2026: मोठी बातमी : दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
Jalgaon Election Result 2026 Winners: कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Embed widget