(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेस नेत्यांची स्ट्रॅटेजी चुकली, काँग्रेसची कोंडी नेमकी कोण करतंय?
Maharashtra Congress : काँग्रेसच्या राज्यातल्या बालेकिल्ल्यावर दावा करायचा सोडून इतर जागांवर दावा करत बसल्याने काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय.
मुंबई: भाजपला हरवण्यासाठी देशपातळीवरती इंडिया आघाडीची निर्मिती झाली तर राज्यामध्ये महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) उभी राहिली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुठेतरी काँग्रेसची (Maharashtra Congress) कोंडी केल्याची भावना आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्यांची स्ट्रॅटेजी चुकल्यामुळे कुठतरी काँग्रेसला माघार घ्यावी लागली. त्यामुळे वाट्याला आलेल्या अनेक जागांवरती काँग्रेसला आता उमेदवार मिळत नसल्याच पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीने महायुतीच्या आधीपासूनच जागा वाटपांच्या चर्चाना सुरुवात केली. अनेक बैठकाही पार पडल्या. मात्र काँग्रेसची कुठेतरी या जागा वाटपात कोंडी झाली अशी भावना आता नेत्यांमध्ये पाहायला मिळतेय.
चुकीच्या पद्धतीने जागा मागितल्या
मुळात जागावाटप होत असताना काँग्रेसने चुकीच्या पद्धतीने जागा मागायला सुरुवात केली. जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यावरती सुरुवातीला काँग्रेसने हक्क दाखवण्याऐवजी इतर जागा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसने कांग्रेसच्या बालेकिल्ल्यावरती दावा करायला सुरुवात केली.
मित्रपक्षाच्या जागांवर दावा करताना बालेकिल्ले सोडले
लोकसभा मतदारसंघांपैकी सांगली, भिवंडी, वर्धा, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई असे अनेक बालेकिल्ले होते. मात्र यावरती दावा करण्याऐवजी काँग्रेसने सुरुवातीलाच रामटेक, कोल्हापूर अशा मित्र पक्षांच्या मतदारसंघावरती दावा केला. त्यानंतर मात्र मित्रपक्षांनी काँग्रेसच्याच बालेकिल्ल्यावर दावा केला. त्यामुळे सांगली, वर्धा, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई यासारख्या अनेक महत्त्वाच्या जागा काँग्रेसला सोडून द्याव्या लागल्या.
अशोक चव्हाणांना जबाबदार धरलं
या सर्वाला जबाबदार मात्र काँग्रेसने अशोक चव्हाण यांना पकडण्यात आलं. कारण अशोक चव्हाण हे पहिल्यापासून जागा वाटपात सक्रिय होते आणि शेवटच्या दिवसापर्यंतही ते या जागावाटपा संदर्भात चर्चा करत होते. त्यांनीच या जागांवरती दावा केला असं काँग्रेस नेत्यांच म्हणणं आहे.
सांगली, वर्धा ,भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई हे हातातून तर गेलेच. मात्र मुंबईमध्ये काँग्रेसला ज्या दोन जागा मिळाल्या, त्यामध्ये उत्तम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई यावरती लढायला आता काँग्रेसकडे उमेदवार नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षातून आता उमेदवार आयात करावा लागेल किंवा सेलिब्रिटी उमेदवार शोधण्याचा पर्याय काँग्रेसने सुरू केला आहे.
आपल्याला उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका करत पक्षाला रामराम केला. तर दुसरीकडे मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीसुद्धा नेत्यांवरती आग पाखड करत नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस नेत्यांसमोर पर्याय उरला नाही
अखेर या जागा वाटपाच्या सगळ्या घोळावरून आघाडीत बिघाडी होते की काय असं चित्र निर्माण होऊ लागलं आणि काँग्रेसच्या हायकमांडने सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली. भाजपला नामोहरण करण्यासाठी एक पाऊल मागे आलं तरी चालेल, अशी भूमिका घेत काँग्रेसच्या हाय कमांडने पारंपरिक असलेल्या काँग्रेसच्या जागा ठाकरे आणि शरद पवार गटांना सोडण्याची सहमती दाखवली. त्यामुळे हातबल झालेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने हा निर्णय मान्य करुन महाविकास आघाडीचा प्रचार करावा लागणणार हे मात्र तेवढच खरं.
ही बातमी वाचा: