तिजोरी बारामतीला अन् किल्ली ठाण्यात; ओरिजनल चावी मात्र नागपुरात; वडेट्टीवारांची विधानसभेत फटकेबाजी
Vijay Wadettiwar : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात जोरदार फटकेबाजी करत सरकारवर हल्लाबोल केला.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा शेवटचा दिवस असून, यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार फटकेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. "राज्याची तिजोरी बारामतीला आहे, पण त्याची एक किल्ली ठाण्यात असून ओरिजनल चावी मात्र नागपुरात असल्याचा,” खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, बीड मधील जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभी होती?, बीडमधील झालेली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. सोलापूरात ड्रग्जचे कारखाने सापडले. त्यामुळे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात ड्रग्जचे कारखाने कुठून आले. गृहमंत्री तुम्ही अनुभवी आहात, मात्र, सरकार तिघांचे असल्याने मी का जबाबदारी घेऊ अशी भूमिका नको पाहिजे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच आणि ड्र्ग माफियाचे जाळ गुजरातपर्यत जोडले गेले. राज्यातील मंत्रीचे नाव या प्रकरणात येतात यावर खुलासा कधी करणार?, नाशिक प्रकरणात बात निकलेगी तो दूर तक चली जायेगी, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच, राज्याची तिजोरी बारामतीला आहे, पण त्याची एक किल्ली ठाण्यात असून ओरिजनल चावी मात्र नागपुरात असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले.
शंभूराज देसाई यांच्यावर टीका...
मुलाना ऑनलाईन गेमिंगपासून दूर करा, अनेक कलाकार ऑनलाईन गेमिंगबाबत प्रसिद्धी देतात. तर, शंभूराजे तुमचे आजोबा कुठे आणि तुम्ही कुठे आहात. राज्यात बिअरचा खप वाढावा म्हणून तुम्ही समिती नेमता, असा टोला वड्डेटीवार यांनी शंभूराज देसाई यांना लगावला.
तरुणाई उध्वस्त होत आहे
गृहखातं आता कमजोर झाला आहे. तीन पक्षाचे सरकार आल्यावर, मीच काय सर्व जबाबदारी घेऊ असे सांगून जबाबदारी झटकण्याचं काम करू नका. मागील तीन महिन्यात गडचिरोलीमध्ये नऊ लोकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. कुठे आहे तुमची कायदा आणि सुव्यवस्था. स्थानिक पोलीस पाटील आणि नागरिक नक्षलवाद्यांचे बळी ठरतायत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने तरुणाई उध्वस्त होत असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे.
राज्यातील 32 लाख लोकं नोकरीच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्रात ड्रग्स लॉबी काम करत आहे. महाराष्ट्राचं उडता पंजाब कोण करतोय. लोकांचं आयुष्य अंधारात कोण ढकलत आहे. या प्रश्नांनी आमच्या काळजाचं थरकाप उडतोय. नाशिक प्रकरणात जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही नक्कीच सांगणार आहे. हे जे काही सर्व सुरू आहे ते कुणाच्यातरी आशीर्वादाने सुरू आहे. राज्यातील 32 लाख लोकं नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. परीक्षेचा गोंधळ आणि बेरोजगारी पाहायला मिळत आहे. पेपर फुटी प्रकरणामुळे तरुण नैराश्यत आहे. या सर्व घटनांना सरकार जबाबदार आहे. जागा रिक्त असताना भरल्या जात नाही, एमपीएससी चा निकाल रखडला जातो. निकाल लागला तरी तरुणाला तीन वर्ष नोकरी लागत नाही. त्यामुळे हा तरुण ड्रग्ज सारख्या मार्गाकडे वळत असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: