दिल्लीत उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन, आप-भाजपमध्ये गदारोळ होण्याची शक्यता
Delhi Assembly Special Session: आप आणि भाजपमध्ये वाद सुरु असतानाच उद्या दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात दोन्ही पक्षांमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे.
Delhi Assembly Special Session: आप आणि भाजपमध्ये वाद सुरु असतानाच उद्या दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात दोन्ही पक्षांमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. केजरीवाल सरकारच्या मद्य धोरणाबाबत केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आणि भारतीय जनता पक्ष (BJP) आपल्या आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणारी आम आदमी पार्टी (AAP) यांच्यात एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते रमेश बिधुरी यांनी विधानसभेला सत्ताधारी पक्षाने राजकीय आखाडा बनवले असल्याचा आरोप केला आहे. एक दिवसीय अधिवेशन बोलावणे म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे ते म्हणाले.
केजरीवाल आणि सिसोदिया यांनी उद्याच्या विशेष अधिवेशनात माफी मागावी- काँग्रेस
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी सभागृहाच्या विशेष अधिवेशनात दारू घोटाळ्याबद्दल खोटे बोलल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी ( Anil Chaudhary) म्हणाले की, "दारू घोटाळ्याचे सत्य बाहेर आणण्यासाठी श्वेतपत्रिका आणण्याबाबत विशेष अधिवेशनात निर्णय घेण्यात यावा."
ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याबद्दल आपने राजघाटावर जाऊन प्रार्थना केली
केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपच्या आमदारांची बैठकी झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारांसह भाजपचे ऑपरेशन लोटस (BJP Operation Lotus) अयशस्वी झाल्याबद्दल प्रार्थना करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाटावर जाऊन प्रार्थना केली. केजरीवाल यांनी आरोप केला की, "त्यांनी (भाजप) आमच्या आमदारांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. त्यांनी दिल्ली सरकार पाडण्यासाठी 800 कोटी रुपये ठेवले आहेत. केजरीवाल म्हणाले, देशातील नागरिकांना या पैशाचा स्रोत जाणून घ्यायचा आहे. हे पैसे GST मधून आले आहे की 'PM Cares' फंडातून? काही मित्रांनी त्याला हे पैसे दिले आहेत का?"
आपचे आमदार राजघाटावर गेल्यानंतर काही तासांनंतर भाजपच्या नेत्यांनी स्मारकाला शुद्ध करण्यासाठी गंगाजल शिंपडले. खासदार मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांची तुलना जर्मन नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांच्याशी केली. ते म्हणाले की, केजरीवाल त्यांच्या सरकारच्या दारू घोटाळ्यापासून लक्ष हटवण्यासाठी वारंवार खोटे बोलत आहेत. दरम्यान, दिल्लीचे राज्यपाल व्हीके सक्सेना आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांची शुक्रवारी होणारी साप्ताहिक बैठक विधानसभेच्या अधिवेशनामुळे रद्द करण्यात आली आहे.