एक्स्प्लोर

विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात राजकीय भूकंप, भाजप-अजितदादा गटातील दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत

लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाआघाडीने जिंकल्या होत्या.

Solapur: लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभेचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये राजकीय घटनांना वेग आला असून विधानसभा निवडणूकीपूर्वी सोलपुरात भाजप आणि अजितदादा गटातील दिग्गज नेते हातात तुतारी धरण्याच्या तयारीत आहेत.  

लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाआघाडीने जिंकल्या होत्या. यामुळे आता विधानसभेला महायुतीतील अनेक विद्यमान आमदार व दिग्गज नेते हे महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे तिकीट मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे . मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपाला बसणार याची जाणीव असल्याने अनेक नेते जरांगे यांची एकाबाजूला भेट घेत असून दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत .

माढा विधानसभा  

माढा विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने भाजपाला हा मोठा धक्का असू शकतो. यापूर्वी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माढ्याचे खासदार झाले आहेत. 

माढ्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबन दादा शिंदे हे देखील अजित पवार गटाला रामराम करून पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यासाठी आमदार शिंदे यांनी आपला मुलगा रणजीत सिंह शिंदे यांच्यासह अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास आमदार शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. माढ्यातूनच आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदेहेही चुलत्याच्या विरोधात बंड करून उमेदवारी मागत आहेत. 

पंढरपूर मंगळवेढ्यात काय स्थिती?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार असून आता या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवू इच्छितात यासाठी परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असून विधानसभेला तुतारी घेऊन निवडणूक लढवू शकतात . प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचे असून पुन्हा ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले यादेखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनीही दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा साठी उमेदवारीची मागणी केली आहे.

भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. याच पद्धतीने लोकसभा निवडणूक काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजीत पाटील हेदेखील विधानसभेला भाजपला सोडचिठ्ठी देत माढा किंवा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यावर अभिजीत पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत शरद पवार यांना साथ दिली होती मात्र त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना भाजपकडे जावे लागले होते. 

करमाळ्यात महायुतीला धक्का?

करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात या विधानसभेलाही संजय शिंदे हे महायुतीतून न लढता पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याने महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. 

सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीला अनेक धक्के पचवावे लागणार

सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे हेही या वेळेला शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे मात्र महायुतीची ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने दीपक साळुंखे ही शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत .
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण मतदार संघात यावेळी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज प्रयत्न करीत असल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी विधानसभेपूर्वी अनेक धक्के पचवावे लागणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget