दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही; सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीत दुफळी
Solapur Politics : सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाद थांबता थांबत नाहीये.
Solapur : राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत वेगळी भूमिका घेतली. मात्र, सोलापुरातील प्रस्थापित नेते शरद पवारांसोबत न जाता अजित पवार यांच्यासोबत राहिले. दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडलेली असली तरीही मोहोळ तालुक्यातील कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. दोघांमध्ये सातत्याने एकमेकांविरोधात कुरघोड्याही करण्यात येतात. आता उमेश पाटलांनी 'दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही', अशी घोषणाच केली आहे.
मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उद्या सोलापूर जिल्ह्यात दौरा, मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र मोहोळ अपर तहसील कार्यालयच्या मुद्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून उद्या मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांचे विश्वासू समजल्या जाणारे, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा देखील बंदला पाठिंबा आहे.
दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही
दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही,असा नारा देत उमेश पाटलांनी बंदला पाठिंबा दिला आहे. उद्याचा बंद हा राजकीय भूमिकेतून नसून लोकांच्या मागणीसाठी असल्याचे मत उमेश पाटील यांनी मांडलं आहे. काही दिवसापूर्वी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात नव्याने अपर तहसील कार्यालय सुरु झालं आहे.
विविध पक्षातील राजकीय नेत्यांचा अनगर येथे हे कार्यलय होण्यास विरोध
मोहोळ येथील विविध पक्षातील राजकीय नेत्यांचा अनगर येथे हे कार्यलय होण्यास विरोध असून या आधी अनेक आंदोलन झाले होते. मात्र आंदोलननंतर ही अनगर येथे हे अपर तहसील कार्यालय सुरु झाले आहे, उद्या अजित पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बंद पुकारून हा विरोध दाखवून देण्याचा प्रयत्न मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीकडून केला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या
Worli Vidhansabha Election : संदीप खरंच हिरा आहे, काका राज ठाकरेंचा पुतण्या आदित्यविरोधात उमेदवार ठरला?