एक्स्प्लोर

मविआत ठिणगी? सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर काँग्रेसचा दावा, शरद पवारांच्या भूमिकेकडं लक्ष 

सोलापूर जिल्ह्यात जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण सोलापूर काँग्रेसकडून (Solapur Congress) सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर दावा करण्यात आला आहे. 

Solapur Congress Vidhansabha Election News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. तसचे इच्छुकांनी देखील गाठी भेटी, संवाद, दौरे काढण्यास सुरुवात केलीय. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असेल किंवा महायुती असेल दोन्हीकडे देखीलल अद्याप जागावाटपाचा पेच काय आहे. अशातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जागावाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण  सोलापूर काँग्रेसकडून (Solapur Congress) सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर दावा करण्यात आला आहे. 

प्रणिती शिंदे विजयी झालेल्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा

सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे बैठकीत  जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर देण्याची मागणी केली आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या या मागणीला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील दुजोरा दिला आहे. पुण्यातील बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींसमोर त्यांनी ही मागणी केली. प्रणिती शिंदे विजयी झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेच्या जागेवर काँग्रेसनं दावा केला आहे. काँग्रेसच्या या दाव्यामुळं महाविकास आघाडीतील घटकपक्ष काय भूमिका घेतात? हे पाहावे लागणार आहे.

शरद पवार गट आणि माजी आमदार नरसाय्या आडम यांच्या भूमिकेकडं लक्ष

दरम्यान, महाविकास आघाडीनुसार शहर उत्तर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मदत केली होती. त्यामुळं आडम यांना शहर मध्यमधून लढण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचा दावा केला होता. त्यामुळं आता शरद पवार गट आणि माजी आमदार नरसाय्या आडम या बाबतीत काय भूमिका घेतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जो पक्ष ज्या ठिकाणी निवडून येईल त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा अशा प्रकारची चर्चा सध्या महाविकास आघाडीत सुरु आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवेल यापेक्षा कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल यावर अधिक भर दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

काँग्रेसनं तिकीट दिलं नाही तरी विधानसभेला उभा राहणारच, प्रतिभा धानोरकरांच्या दिरानं बंडाचं निशाण फडकावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget