एक्स्प्लोर

पावसाने धुमाकूळ घातलाय, वादळही आलंय; पुरुषोत्तम धोंडगेंचा प्रवेश, उद्धव ठाकरेंचा सरकार अन् वेधशाळेला टोला

सगळे चोर दिसत आहेत, कोणी पैसे चोरतंय, कुणी मत चोरतय, कुणी पक्ष चोरतय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिसेनाशी झाली आहेत.

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माजी खासदार आणि आमदार भाई केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम भाऊ धोंडगे हे मातोश्रीवर आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत त्यांचा शिवसेना उबाठा पक्षात आज पक्षप्रवेश झाला. यावेळी, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, विनायक राऊत, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची उपस्थिती होती. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबईसह नांदेडमधील पाऊस (Rain) आणि पूरस्थितीवर भाष्य केलं असून यास सरकार जबाबदार असल्याचे म्हटले. तसेच, मुंबईतील (Mumbai) पावसावर भाष्य करताना हवामान वेधशाळेलाही टोला लगावला. दरम्यान, केवशराव धोंडगे हे नांदेड जिल्ह्यातून 5 वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. धोंडगे 1957 मध्ये पहिल्यांदा द्वैभाषिक महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1962, 1972, 1985 आणि 1990 मध्ये ते विधानसभेचे आमदार बनले होते. 

राजकारणामध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला जातोय, इथं माणूसच दिसेना झाला आहे. सगळे चोर दिसत आहेत, कोणी पैसे चोरतंय, कुणी मत चोरतय, कुणी पक्ष चोरतय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिसेनाशी झाली आहेत. राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला असतानाही तुम्ही सर्वजण इथं आला आहात, त्यातून तुमची जिद्द दिसते. मी सोशल मीडियावर बघितलं, मुंबईत भगवं वादळ येत आहे. पण, हे जे नैसर्गिक वादळ आलं त्याचं काय?. मुंबईमध्ये तुम्ही बघताय नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. विमानतळावरील पाण्याचे फोटो येत आहेत. आता हे विमानतळ कोणाकडे आहे? त्यामुळे आता बंदर करायची गरज नाही. जहाज पण तिथेच येतील आणि विमान पण तिथे येतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अदानींवरही निशाणा साधला.  

दरम्यान, आपले सगळे शिवसैनिक आपत्तीग्रस्तांना मदत करत आहेत, पण ही आपत्ती का आली. तर, 11 गावांचे पुनर्वसन न करता धरणाचं काम सुरू केलं आणि जे व्हायला नको होतं ते झालं. यांना माणसाची कदर नाही, माणुसकी तर नाहीच आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिसे कसे भरायचे एवढेच माहिती आहे. 

उद्धव ठाकरेंचा वेधशाळेला टोला

तुम्ही आज इकडे आलाय, पण आता जाताना व्यवस्थित जावा. कारण, पावसाने धुमाकूळ घातला आहे, वादळही आहे आणि बऱ्यात दिवसांनी वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसमोरच वेधशाळेलाही टोमणा लगावला. वेधशाळेने कालच सूचना दिल्या आणि त्यानुसार आज पाऊस सुरू असून मुंबईत आणि इतरही ठिकाणी शाळा, कार्यालये बंद आहेत. तुम्ही तिकडे पोहोचल्यानंतर त्या 11 गावांमध्ये जी आपत्ती आली आहे, जी नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. त्या गावकऱ्यांचे तिथे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असतं तर कोणाला जीव गमवायची वेळ आली नसती, असेही ठाकरेंनी म्हटले. 

हेही वाचा

मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस, संध्याकाळी समुद्राच्या भरतीपर्यंत पाऊस सुरुच राहिला तर... मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Embed widget