Vijay Shivtare : कॅपिसिटी असतांना डावललं; माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होता तसा..; नाराज विजय शिवतारेंची आगपाखड
Mahayuti Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेते नाराज झाले आहेत. अशातच पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी तिखट भाषेत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
Vijay Shivtare पुणे सासवड : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो कारण दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला. पात्रता असताना देखील डावले गेलं, डावलण्यामागे एकनाथ शिंदे यांची करणे असतील. मला मंत्री पद का नाकारले मला माहित नाही, पण ठीक हे आहे कुटुंबातील प्रश्न आहे. तो आम्ही बघू मात्र मी नाराज झालो होतो. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोकं नागपुरात आले. एखादा माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होता, तसा झाला त्यामुळे मी अस्वस्थ होतो. कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, त्यांचा अपेक्षा भंग झाला. कॅपिसिटी होती म्हणून वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे झालं नाही. मंत्री पद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी मला सांगितले असते तर शांत राहिलो असतो, उलट मी थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिले असते. अशी आगपाखड करत मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेल्या शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी तिखट भाषेत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
आमच्या वाईटावर असून सुद्धा 27 हजारांचे मला मताधिक्य
मी निवडणूक झाल्यावर मुंबईत होतो, त्यामुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळयांसमोर ठेवून आजची बैठक घेतली आहे. मी पुन्हा आज नागपूरला जाणार आहे. विजय शिवतारे पक्षाचा माणूस आहे. जर विजय शिवतारे यांना मंत्रिपद विचारलं नाहीतर विजय शिवतारे कुणाला विचारणार नाही. आमच्या वाईटावर असून सुद्धा 27 हजाराचा मताधिक्य जनतेने मला दिलं, त्यांची सेवा मला करायची आहे. कुणी वाईटावर आहे हे सगळ्यांना माहित आहे, त्याच्यामुळे कशाला ते बोलायचं. माझे मंत्रीपद कापण्या इतपत त्यांची पोहोच नाही. असे म्हणत नाव न घेता विजय शिवतारे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
संध्याकाळी पुन्हा नागपुरात अधिवेशनासाठी जाणार-विजय शिवतरे
विजय शिवतरे यांनी अधिवेशातून थेट सासवडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था ताकतीने लढवण्याच्या सूचना विजय शिवतारे यांनी बैठक दिल्या. तसेच आगामी काळात कशा पद्धतीने वाटचाल करायची यावर चर्चा करण्यात आली. मंत्रिपद न मिळाल्याबाबत कायकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आणखी जोशाने काम लागण्याच्या सूचना शिवतारे यांनी कार्यकर्त्यांनी दिल्यात. आज संध्याकाळी शिवतारे पुन्हा नागपुरात अधिवेशनासाठी जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हे ही वाचा