(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Shivsena : घरोघरी करणार शिवसेनेचा विस्तार, महिला आघाडीत शेकडो रणरागिणी सामिल
महिला पदाधिकारी प्रामाणिकपणे कार्यरत असतात. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन कार्य करीत असतात. महिलांना संधी मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाऊल गाठू शकतात असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नागपूरः एकीकडे राज्यात खरी शिवसेना आणि शिवसेनेच्या धनुष्या बाणावरील हक्काची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना नागपुरात शिवसेना महिला आघाडी मध्ये शेकडो महिलांनी प्रवेश घेतला. तसेच पुर्व विदर्भ संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा.शिल्पा बोडखे यांच्या नेतृत्वात पक्षासोबत प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली. शहरातील रविभवन येथे जिल्हा संघटिका सुरेखा खोब्रागडे व जिल्हा संघटिका सुशीला नायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येत्या नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने सहा विधानसभेतील महिलांना शाखा, उपशाखा, उपविभाग संघटिका व उपशहर संघटिका पदाची जबाबदारी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी शिवसेनेत अनेक महिलांनी प्रा.शिल्पा बोडखे यांच्या हस्ते प्रवेश घेतला. महिला या सर्वच क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत असतात महिलांच्या समस्या आत्मीयतेने सोडवितात व तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन कार्य करीत असतात महिलांना संधी मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाऊल गाठतात. म्हणुन येत्या महानगरपालिकेत देखील समाजकारणातुन मतदार तयार करावे व शिवसेनेची मजबुत पकड नागपूर शहरात महिला आघाडीच्या पुढाकाराने होईल अशी अपेक्षा बोडखे यांनी व्यक्त केली.
NMC Elections : प्रभाग चारचं, नव्याने आरक्षण; पुन्हा आरक्षणाचे दिव्य?
घरोघरी शिवसेनेचा करणार विस्तार
यावेळेस जिल्ह्यातील प्रत्येक प्रभागात महिला शिवसैनिक घरोघरी तयार करण्याचे आश्वासन जिल्हा संघटक सुशीला नायक व सुरेखा खोब्रागडे यांनी दिले. शहराची जबाबदारी घेऊन महिला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शहर संघटक माजी नगरसेविक मंगला गवरे व सुरेखा गाडे यांनी दिली. सूत्रसंचालन विजेता कांबळे यांनी केले. बैठकीत मोठ्या संख्येत महिला शिवसैनिकांची उपस्थिती होती.